कर्जमाफी न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांना नवे कर्ज; कापूस खरेदी चौपटीने करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:21 AM2020-05-22T02:21:30+5:302020-05-22T06:17:52+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

New loans to millions of farmers who have not received loan waivers; Will buy cotton fourfold | कर्जमाफी न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांना नवे कर्ज; कापूस खरेदी चौपटीने करणार

कर्जमाफी न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांना नवे कर्ज; कापूस खरेदी चौपटीने करणार

Next

मुंबई : राज्यात अद्याप महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांनादेखील खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्यात येणार आहे. तसेच कापूस खरेदीचा वेग चौपटीने वाढविण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
कर्जमुक्ती योजनेसाठी ३० लाख लाभार्थी शेतकºयांची यादी सहकार विभागाने निश्चित केली होती. मार्चपर्यंत त्यातील १९ लाख शेतकºयांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ११ लाख १२ हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत. लॉकडाउनमुळे सरकारी यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीच्या खर्चाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ८ हजार १०० कोटी रुपयांची कर्जमाफी देता आली नाही. ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना थकबाकीदार म्हणून गृहीत न धरता नव्या कर्जाचा लाभ देण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. खरीप हंगामासाठी ४४ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यात बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रयोगशील शेतकºयांची रिसोर्स बँक केली असून शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.

‘अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या’
कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे शेतीबरोबरच अन्य कुठल्या क्षेत्रात आव्हाने आहेत यावर चर्चा करण्यासाठी सविस्तर बैठक लवकर घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दररोज दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करा - अजित पवार
कापूस, मका, तूर,हरभरा, ज्वारी, धानाची खरेदी वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. ही खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात दिले होते. कापसाची खरेदी कोणत्याही परिस्थितीत २० जूनपर्यंत संपायला हवी. दररोज दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करा, असे पवार यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू
शकेल, असे ते म्हणाले .

Web Title: New loans to millions of farmers who have not received loan waivers; Will buy cotton fourfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.