अॅलोपॅथी डॉक्टरांसाठी आता नवा लोगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:51 AM2017-07-28T04:51:14+5:302017-07-28T04:51:17+5:30
दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढते आहे. याचा फटका बºयाच रुग्णांना बसत आहे. या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेसह आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही पुढाकार घेतला आहे
मुंबई : दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढते आहे. याचा फटका बºयाच रुग्णांना बसत आहे. या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेसह आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही पुढाकार घेतला आहे. अॅलोपॅथी डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने नवा लोगो तयार केला आहे. लवकरच हा नवा लोगो डॉक्टरांच्या क्लिनिकवर दिसेल.
या नव्या लोगोच्या डिझाइनमध्ये रंग, अक्षर, आकार ठरवून दिलेला आहे. त्यामुळे लोकांना सहज अॅलोपॅथी डॉक्टर्स ओळखता येतील.
याविषयी देशभरातील डॉक्टरांना त्यांच्या लेटरहेड आणि क्लिनिकच्या बाहेरील बोर्डावर हा नवा लोगो लावण्यासाठी सांगणार आहोत. हा लोगो केवळ अॅलोपॅथी डॉक्टरांकरिता आहे. यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येईल. तसेच, या लोगोचा गैरवापर करणाºयांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल यांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अॅलोपॅथी डॉक्टरांची वेगळी ओळख दर्शविणारा लोगो नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने अॅलोपॅथी डॉक्टरांसाठी लोगो असावा यासाठी प्रयत्न सुरू केले. पाठपुरावा करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने लोगोचे पेटंटही मिळविल्याचे
डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.