राज्यात १,०१७ शाळांना नवा लूक

By admin | Published: March 28, 2016 02:07 AM2016-03-28T02:07:02+5:302016-03-28T02:07:02+5:30

राज्यातील १ हजार १७ शाळांना नवा लूक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शाळांच्या पायाभूत आणि तंत्रज्ञान विकासासाठी जवळपास १९ कोटींचा भरीव निधी

A new look to 1,017 schools in the state | राज्यात १,०१७ शाळांना नवा लूक

राज्यात १,०१७ शाळांना नवा लूक

Next

- जितेंद्र ढवळे,  नागपूर
राज्यातील १ हजार १७ शाळांना नवा लूक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शाळांच्या पायाभूत आणि तंत्रज्ञान विकासासाठी जवळपास १९ कोटींचा भरीव निधी अल्पसंख्याक विकास विभागाने मंजूर केला आहे.
राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल, शासनमान्य खासगी अनुदानित-विनाअनुदानित, नगरपालिका, महानगरपालिका शाळा आणि अपंग विद्यार्थी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा शाळांचा लूक बदलवण्याचा संकल्प अल्पसंख्याक विभागाने केला आहे. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षासाठी १९ कोटी २३ लाख ६३ हजार
निधी मंजूर करण्यात आला
आहे. त्यानुसार खासगी अल्पसंख्याक संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना या शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, अद्ययावत प्रयोगशाळा आणि
तंत्रज्ञान विकासासाठी लागणाऱ्या विविध साधनांची खरेदी करता
येणार आहे.
या शाळांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीबाबतचे प्रस्ताव राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांच्या वतीने सरकारकडे पाठविण्यात आले होते. यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक २०५, ठाणे ११८, अमरावती १०३, अकोला ८२ आणि नागपूर जिल्ह्यातील ७२ शाळांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A new look to 1,017 schools in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.