पतीच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’प्रेमाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Published: January 28, 2016 01:36 AM2016-01-28T01:36:45+5:302016-01-28T01:36:45+5:30

पतीचे सतत मोबाइलवर राहणे, व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर बिझी असणे, उशिरा झोपणे नि उशिरा उठणे, मित्रांसोबत हुंदडणे हा प्रकार पसंत न पडल्याने, अवघ्या महिन्याभरात

New-married suicidal tenderness in husband's 'What's app' tradition | पतीच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’प्रेमाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

पतीच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’प्रेमाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

Next

अमरावती : पतीचे सतत मोबाइलवर राहणे, व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर बिझी असणे, उशिरा झोपणे नि उशिरा उठणे, मित्रांसोबत हुंदडणे हा प्रकार पसंत न पडल्याने, अवघ्या महिन्याभरात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली.
मोर्शी येथील धर्मपाल तिवारी यांची कन्या पूनमचा विवाह अमरावतीच्या अभिजित त्रिवेदी याच्यासोेबत ३ जानेवारी रोजी झाला होता, पण महिना होण्यापूर्वीच पती-पत्नीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर व्यस्त असणे, रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे आणि मित्रांसोबत सतत बाहेर राहणे पूनमला आवडत नव्हते. या कारणावरून त्यांची सतत भांडणे होत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
बुधवारीदेखील अभिजित सकाळी १०.३० वाजता उठला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या कल्याचे आढळून आले. तिला सुरुवातीला खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: New-married suicidal tenderness in husband's 'What's app' tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.