भाजपा कार्यकारिणीत नव्या चेह:यांना संधी
By admin | Published: August 3, 2014 02:06 AM2014-08-03T02:06:51+5:302014-08-03T02:06:51+5:30
पाच दिवसांत पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार असून, महाराष्ट्रातील नवीन चेह:यांना स्थान देण्यात येणार आहे.
Next
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडीवर 9 ऑगस्टला राजधानीत होणा:या राष्ट्रीय परिषदेत सर्वसहमतीची मोहर उमटल्यानंतर, पाच दिवसांत पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार असून, महाराष्ट्रातील नवीन चेह:यांना स्थान देण्यात येणार आहे.
215 जणांच्या सध्याच्या कार्यकारिणीत 12 जण महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, पूनम महाजन, एकनाथ खडसे, विनोद तावडे, किरीट सोमय्या, पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, शायना एन.सी, अजय संचेती हे सध्या कार्यकारिणीत आहेत. जावडेकर हे पक्षप्रवक्ते तर महाजन या राष्ट्रीय सचिव आहेत.
सूत्रने सांगितले,की राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नेमण्यात येणार होते, तीन दिवसांपूर्वी त्यांच्याशी चर्चाही झाली. मात्र राज्यात निवडणुका असल्याने त्यांनी नकार दिला आहे. आपल्याशी चर्चा झाली असून, आपण नकार दिल्याचे तावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यानंतर याच पदासाठी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव पुढे आले. भाजपातील गटबाजी त्यांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे.
प्रकाश जावडेकर यांच्या जागेवर पक्षाचे मुख्यप्रवक्ते म्हणून विनय सहस्त्रबुद्धे यांना आणले जाऊ शकते. संघाने या नावाला पसंती दिली आहे. शायना एन.सी कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांचेही नाव प्रवक्त्यांच्या यादीत आहे. पूनम महाजन यांना पदोन्नती द्यावी असा एका गटाचा प्रयत्न सुरू आहे.
पुण्यातील आमदार गिरीश बापट यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्याचा विचार संघ करीत आहे. खजिनदार पीयूष गोयल राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या जागी महाराष्ट्रातून कोणालाही न घेता, हे पद गुजरातच्या ताब्यात देण्यावर शहा यांचा भर आहे. तथापि, त्यांनाच या पदावर कायम ठेवावे यासाठी प्रयत्न होत आहेत. आता हा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करूनच सुटणार आहे.
यापूर्वीच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून काही नावांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, मात्र अंतिम निर्णय मोदी व शहा यांचाच असेल. कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यापूर्वी संघाचे मत घ्या, असे शहा यांना नागपूर भेटीत स्पष्टपणो सांगण्यात आल्याने गडकरी यांच्या शब्दाला बळ मिळण्याची शक्यता आहे.