राज्यभरात दूध महागले, 11 जानेवारीपासून नवे दर लागू
By admin | Published: January 8, 2017 06:46 PM2017-01-08T18:46:41+5:302017-01-08T18:46:41+5:30
11 जानेवीपासून राज्यात दूधाच्या किमतीत वाढ होणार आहे. पुण्यातील कात्र जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात खाजगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 11 जानेवीपासून राज्यात दूधाच्या किमतीत वाढ होणार आहे. पुण्यातील कात्र जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात खाजगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयाने वाढ करण्यात आली आहे.
कात्रज, अमुल, चितळे, कृष्णासह राज्यातील इतर दुधाच्या किंमतीत वाढ होणार आहे. गाईच्या खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय म्हशीच्या दुधाच्या दरातही लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
तर विक्री दरात २ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून 22 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणारं दूध आता 25 प्रतिलिटरने खरेदी केलं जाणार आहे. तर पूर्वी या दूधाची विक्री 40 रुपये प्रतिलिटरने करण्यात येत असे, मात्र आता याची विक्री 42 रुपये प्रतिलिटरने करण्यात येणार आहे.