निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे नवे नियम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:03 AM2018-08-04T01:03:45+5:302018-08-04T01:03:53+5:30
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच निवडणुकीची जबाबदारी असलेल्या अधिका-यांच्या नियुक्तीबाबत नवे नियम राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत.
मुंबई : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच निवडणुकीची जबाबदारी असलेल्या अधिका-यांच्या नियुक्तीबाबत नवे नियम राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत.
निवडणुकीची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांची कामातील सचोटी आणि प्रामाणिकपणा आधी तपासून मगच त्यांची नियुक्ती केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या दिनांकास सध्याच्या पदावर तीन वर्षे पूर्ण होत असलेल्या अधिकाºयास निवडणुकीची कामे देण्यात येणार नाहीत.अधिकाºयाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत सध्याच्या पदावरून बदली केली जाणार नाही अथवा त्यास कार्यमुक्त केले जाणार नाही. निवडणूक होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंधित अधिकारी जिल्ह्याचा रहिवाशी असू नये; परंतु हा निकष जिल्हा संवर्गातील कर्मचाºयांबाबत बंधनकारक नसेल. प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू झाल्यापासून पोलीस, उत्पादन शुल्क व इतर विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासूनच राबविल्या जातील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी स्पष्ट केले.