नव्या इमारतींसाठी नवीन कर आकारणी
By Admin | Published: February 16, 2015 03:27 AM2015-02-16T03:27:44+5:302015-02-16T03:27:44+5:30
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने नवीन इमारती झाल्या आहेत. त्या इमारतींना नवीन कर
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने नवीन इमारती झाल्या आहेत. त्या इमारतींना नवीन कर आकारणी होणार असल्याने विकासकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शासनाने भिवंडी नगरपालिकेच्या मर्यादित क्षेत्रात महानगरपालिका स्थापन करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, २००३ साली विकास आराखडा जाहीर झाला़ परंतु, सुरुवातीला तत्कालीन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून शहरात अपेक्षित व टिकाऊ विकासकामे झाली नाहीत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मनपा क्षेत्रातील विकासकामांना जोर धरला असून उंच टॉवरची बांधकामे सुरू झाली आहेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याची मागणी करण्यात येते.
या सुविधा पुरविण्याच्या निमित्ताने नगररचना विभागाने नवीन इमारतींचा विकासदराचा वेगळा संचय करून त्यांना सुविधा प्रदान करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे नवीन इमारतींच्या रहिवाशांना सर्व सोयीसुविधा मिळणार आहेत. भिवंडी महानगरपालिका १४ वर्षांपासून अस्तित्वात आली. परंतु, जुन्या व नवीन अशा सर्व इमारतींना एकाच पट्टीने मोजून कर आकारणी केली जात होती. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून दरवर्षी १ एप्रिलपासून शहरात नवीन होणाऱ्या इमारतींना नवीन दराने कर आकारणी करण्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी ठरविले आहे. त्यामुळे शहरातील विकासकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)