नवे तंत्रज्ञान देणार 30 टक्के अधिक बायोगॅस!

By admin | Published: October 17, 2014 02:02 AM2014-10-17T02:02:19+5:302014-10-17T02:02:19+5:30

अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणा:या जैववायूचे (बायोगॅस) नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे 3क् टक्के अधिक जैववायू उत्पादित केला जात आहे.

New technology will give 30 percent more biogas! | नवे तंत्रज्ञान देणार 30 टक्के अधिक बायोगॅस!

नवे तंत्रज्ञान देणार 30 टक्के अधिक बायोगॅस!

Next
राजरत्न सिरसाट - अकोला
अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणा:या जैववायूचे (बायोगॅस) नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे 3क् टक्के अधिक जैववायू उत्पादित केला जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला आहे. 
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जास्नेत मंत्रलयाद्वारे देशात जैववायू निर्मिती, राष्ट्रीय प्रकल्प राबविण्यात येत असून, 2क्क्6र्पयत या प्रकल्पांतर्गत देशात 38 लाख 34 हजार कौटुंबिक वापराच्या जैववायू संयंत्रची उभारणी करण्यात आली आहे. 
या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू संयंत्रमध्ये गायी, बैल, म्हैस आदी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. या संयंत्रला पाण्याची गरज असते; परंतु उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने बहुतांश संयंत्र बंद पडली आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू संयंत्रमध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे संयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या संयंत्रयाचे डिझाईन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदीचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे. 
 
सुधारित बायोगॅस तंत्रज्ञान
च्स्थिर घुमट असलेले नवे संयंत्र
च्ताजे व ओले शेण भरण्यास योग्य 
च्शेणपाण्याचे मिश्रण करण्याची गरज नाही
च्संयंत्र भरणो सोपे जाते
च्मळी लवकर वाळते त्यामुळे वाहतुकीचा खर्च होत नाही.
च् बांधकामाचा खर्च सामान्य रचनेच्या संयंत्रएवढाच
 
 विकसित संयंत्र 3क् टक्क्यांपेक्षा अधिक बायोगॅस निर्माण करते. या संयंत्रचे सर्व प्रकारचे परीक्षण करण्यात आले आहे. पारंपरिक बायोगॅस संयंत्रला हा उत्तम पर्याय आहे.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे, संशोधन अभियंता, कृषी अभियांत्रिकी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 
3क् टक्क्यांपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन 
या नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या संयंत्रपेक्षा 3क् टक्के अधिक जैववायूचे उत्पादन केले जाते. या सुधारित संयंत्रचा धारणाकाळ सामान्य संयंत्रपेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू उत्पादनात वाढ झाली आहे. या पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. 
अनुदान उपलब्ध
दोन घनमीटरचा बायोगॅस बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून 8 हजार रुपये अनुदान दिले जाते. या संयंत्रला शौचालय जोडले असल्यास 1 हजार रुपये अधिक दिले जातात. आताच्या बांधकाम साहित्याच्या दरानुसार 3क् हजारांर्पयत 2 घनमीटरचे बायोगॅस संयंत्र उभारता येते.

 

Web Title: New technology will give 30 percent more biogas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.