राज्यातील एसटी कर्मचा-यांना मिळणार नवीन गणवेश, ३१ विभागीय कार्यालयांत वितरण सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 10:38 PM2018-01-04T22:38:33+5:302018-01-04T22:39:11+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने राज्यातील एसटी कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ६ जानेवारीला मुंबई मुख्यालयासह राज्यातील ३१ विभागीय कार्यालयांत कर्मचा-यांना नवीन तयार गणेवेश वितरण सोहळा व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण होणार आहे.
संदीप मानकर
अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने राज्यातील एसटी कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ६ जानेवारीला मुंबई मुख्यालयासह राज्यातील ३१ विभागीय कार्यालयांत कर्मचा-यांना नवीन तयार गणेवेश वितरण सोहळा व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण होणार आहे.
नवीन वर्ष हे राज्य मार्ग परिवहन विभागाच्या परिवर्तनाचे असून या वर्षात कार्यान्वित होणा-या विविध प्रवासी व कर्मचारीभिमुख योजनांमुळे बससेवेचा कायापालट झालेला दिसेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केले. ६ जानेवारीला मुंबई सेंट्रल मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला परिवहनमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. या ठिकाणी एकाच वेळी इतर ३१ विभागांत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत गणवेश वाटप होणार असल्याचे एसटी महामंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
गणवेश ही संस्थेची प्रतिष्ठा असते. कर्मचा-यांनी गणवेश परिधान केलेल्या गणवेशातून संस्थेप्रती अभिमान प्रकट होतो. एसटी महामंडळाचे विविध १६ संवर्गात १ लाख ५ हजार कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिला जात असे. कापड पसंत न पडल्यास आपल्या सोईने कर्मचारी गणवेशाचे खाकी रंग कोणता? हे ओळखणे अवघड होत असे. एकाच पदावर काम करणाºया अनेक कर्मचा-यांना गणवेशात रंगापासून शिलाईपर्यंत वैविध्य दिसून येत असे. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचा-यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मांडली होती. ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता राज्यात सर्व विभागात एकाच वेळीस गणवेश वाटप सोहळा पार पडणार आहे.
श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक अमरावती विभाग - कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचे आदेश धडकले असून ६ जानेवारीला अमरावती विभागातही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.