पोलिओची नवीन लस

By admin | Published: April 2, 2016 01:42 AM2016-04-02T01:42:38+5:302016-04-02T01:42:38+5:30

देशात असलेल्या पोलिओ रुग्णांमध्ये पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्ण आहेत. तथापि, पी २ विषाणूबाधित रुग्ण देशात नाहीत. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपासून पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात

New vaccine of polio | पोलिओची नवीन लस

पोलिओची नवीन लस

Next

- पूजा दामले,  मुंबई
देशात असलेल्या पोलिओ रुग्णांमध्ये पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्ण आहेत. तथापि, पी २ विषाणूबाधित रुग्ण देशात नाहीत. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपासून पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात बदल करण्यात येणार आहे. पोलिओसाठी देण्यात येणाऱ्या लसीमध्ये तीन विषाणूंऐवजी पी १ आणि पी ३ या दोन विषाणूंसाठी लस तयार केली आहे.
पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण न आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त’ घोषित केले. सध्या देशात पोलिओच्या रुग्णांमध्ये पी १ विषाणूबाधित रुग्णांची संख्या अधिक असून पी ३ विषाणूबाधित रुग्णदेखील आहेत. आता पी २ विषाणूमुळे पोलिओ होण्याचा धोका राहिलेला नाही. याआधी ३ लसी एकत्र करून दिल्या जात होत्या. आता २ लसी एकत्र करून दिल्या जाणार आहेत. आता ‘बायव्हॅलिड ओरल पोलिओ व्हॅक्सिन’ देण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. आर.आर. शिंदे यांनी दिली.
बाळ जन्मल्यावर सहाव्या, दहाव्या आणि सोळाव्या आठवड्यात लसीकरण केले जाते. यापुढे सोळाव्या आठवड्यात लस देताना पोलिओची नवी लस टोचली जाणार आहे. जगभरात एप्रिल २०१६मध्ये हा बदल होणार असून देशात २५ एप्रिलला हा बदल होईल. या दिवसापासून पोलिओसाठीचा तीन लसींचा वापर पूर्णपणे बंद केला जाणार असून नवीन लस दिली जाणार आहे, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले, पोलिओ कोणत्या विषाणूमुळे झाला आहे, हे पाहून कळत नाही. पोलिओ रुग्णाची स्टूल तपासणी केल्यावर पोलिओ नक्की कोणत्या विषाणूमुळे झाला आहे, हे स्पष्ट होते. आता ‘बायव्हॅलिड ओरल पोलिओ व्हॅकसिन’चा वापर फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: New vaccine of polio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.