नेवाळी विमानतळाची जमीन शेतक-यांना परत करता येणार नाही - राज्य सरकार
By admin | Published: March 21, 2016 05:29 PM2016-03-21T17:29:27+5:302016-03-21T17:29:27+5:30
कल्याण येथील ब्रिटीशकालीन नेवाळी विमानतळाची जागा वापराविना पडून असली तरी नियमानुसार सदर जमीन शेतक-यांना अथवा मुळ भूधारकांना परत करता येणार नाही, असे स्पष्टीकरण
मुंबई : कल्याण येथील ब्रिटीशकालीन नेवाळी विमानतळाची जागा वापराविना पडून असली तरी नियमानुसार सदर जमीन शेतक-यांना अथवा मुळ भूधारकांना परत करता येणार नाही, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिले आहे. काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न विचारला होता. ब्रिटीशकालीन नेवाळी विमानतळाची जागा वापराविना पडून असल्याने सदर जागा मुळ भूधारक शेतक-यांना परत करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असून त्याबाबत राज्य सरकारने काय निर्णय घेतला अशी विचारणा करण्यात आली होती. यावर, दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाठयांकडून या प्रकरणाबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. नेवाळी विमानतळाची जमीन पडीक असली तरी सार्वजनिक कामांसाठी संपादित केलेली जमीन, वापरुन झाल्यानंतर अतिरिक्त झाल्यास तिचा वापर सार्वजनिक कामासाठीच करावा लागतो. तसे शक्य नसल्यास सदर अतिरिक्त जमीनीचा जिल्हाधिका-यांमार्फत लिलाव करण्यात येतो. या लिलावात मुळ भूधारकालाही सहभागी होता येते. संपादित जमीन अतिरिक्त ठरल्यास करावयाच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अनुसरुनच राज्य सरकारने धोरण निश्चित केले असल्याचे खडसे यांनी उत्तरात नमूद केले आहे.