न्हावरेत नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Published: April 27, 2016 01:37 AM2016-04-27T01:37:57+5:302016-04-27T01:37:57+5:30

न्हावरे (ता. शिरूर) येथे नवविवाहितेने नवरा, दीर, सासरा यांच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. विवाहानंतर दोनच महिन्यांत ही घटना घडली.

Newborn marriage suicides in New York | न्हावरेत नवविवाहितेची आत्महत्या

न्हावरेत नवविवाहितेची आत्महत्या

Next

न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथे नवविवाहितेने नवरा, दीर, सासरा यांच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. विवाहानंतर दोनच महिन्यांत ही घटना घडली.
रेश्मा विकास पवार (वय २१, रा. न्हावरे) असे विवाहितेचे नाव आहे. रेश्माचा पती विकास काळू पवार, सासरा काळू पवार, दीर प्रकाश काळू पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास व काळू पवार यांना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पवार अद्याप फरार आहे. दोन महिन्यांपूर्वीच २ फेब्रुवारी रोजी रेश्मा आणि विकास यांचा विवाह झाला होता. या लग्नसमारंभासाठी रेश्माचे वडील बाळासाहेब ताय्याप्पा गुंजाळ यांनी मोठा खर्च केला होता. लग्नानंतर विकास, काळू, प्रकाश व्यवसाय वाढवण्यासाठी तिच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी मागणी करीत होते. तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. विकास पवार याला एक तरुणी नेहमी फोन करीत असे, याबाबत रेश्माने प्रकाशला विचारणा केल्यानंतर तो तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत व मानसिक त्रास देत असे. १८ एप्रिल रोजी रेश्मा तिच्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी गेली होती. सासरा, नवरा, दीर माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून खूप छळतात, असे तिने वडील बाळासाहेब गुंजाळ यांना सांगितले. पुन्हा तिला नवरा, सासरे, दीर यांच्याकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने काल सोमवार (दि. २५) रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रेश्माच्या आत्महत्येची वार्ता समजताच तिच्या माहेरहून (बारलोणी, ता. माढा) सुमारे १५० नातलग न्हावरे येथे आले होते. सकाळी न्हावरे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पोलिसांनी रेश्माचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. परंतु जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रेश्माच्या नातलगांनी घेतला. दरम्यान, रेश्माचा मृतदेह त्यांच्या नातलगाच्या ताब्यात देताना उपस्थित नातेवाइकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
रेश्माचे एम.ए.पर्यंत शिक्षण झाले होते. पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे, पोलीस हवालदार प्रल्हाद जगताप, विकास कापरे करीत आहेत.

Web Title: Newborn marriage suicides in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.