मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेह-यांना संधी मिळणार

By admin | Published: May 8, 2016 09:41 PM2016-05-08T21:41:59+5:302016-05-08T21:56:30+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवी झेंडी दिली.

Newcomers get opportunity to expand in cabinet | मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेह-यांना संधी मिळणार

मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेह-यांना संधी मिळणार

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 8- रविवारी दुपारी संघ मुख्यालयात संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने नागपुरात दाखल झाले. महालातील संघ मुख्यालयात जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी जवळपास तासभर चर्चा केली. या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवी झेंडी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपुरात येत संघाशी चर्चा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे कौटुंबिक कामासाठी सकाळीच नागपुरात दाखल झाले. यानंतर दुपारनंतर संघ मुख्यालयात संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुरात दाखल झाले. क्षेत्रीय प्रचारक रवी जोशी, प्रदेश भाजपचे संघटन मंत्री रवींद्र भुसारी, महानगर संघचालक राजेश लोया या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सायंकाळी ६ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने विमानाने नागपुरात दाखल झाले व महालातील संघ कार्यालयात पोहोचले. तेथे या सर्व नेत्यांची तासभर बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात असलेल्या कोणत्याही मंत्र्याला कमी करून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा चांगले काम करीत असलेल्या इतर नेत्यांना विस्तारात सामावून घ्यावे, असे या बैठकीत ठरले. पुढील वर्षात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे गणित आखून कुणाला संधी देणे फायद्याचे ठरेल, यावर विचारमंथन झाले. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईसाठी रवाना झाले. बैठकीनंतर संघ व भाजपमधील कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

सेनेविरोधात आक्रमक भूमिका
- शिवसेनेचे नेते या ना त्या मुद्यावरून सातत्याने भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. शिवसेना वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात आतापासूनच आक्रमक व्हायचे की ह्यवेट अ‍ॅण्ड वॉचह्णची भूमिका घ्यायची, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

- दुष्काळ व विदर्भावरही चर्चा
प्राप्त माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील दुष्काळ व वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या हालचाली यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेत दुष्काळ निवारणासाठी मदतीची मागणी केली होती. या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली; सोबतच वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरही संघ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले.

Web Title: Newcomers get opportunity to expand in cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.