पुण्यात आकाशवाणीच्या बातम्या सुरु रहाणार
By Admin | Published: August 12, 2016 12:32 PM2016-08-12T12:32:52+5:302016-08-12T14:19:17+5:30
पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार नसून, बातम्या चालू ठेवणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार नसून, बातम्या चालू ठेवणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे मंगळवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
कोट्यवधी लोकांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या बातम्यांचा ‘आवाज’ बंद होणार असल्याने आकाशवाणीतील वृत्त निवेदकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी वृत्त निवेदकांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात होते.
आणखी वाचा
खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलणे झाल्यानंतर शिरोळे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैकय्या नायडू यांना पत्र पाठवले. तसेच, या निर्णयाबाबत टिवट करुन पुणेकरांनीही आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले होते.
टीव्ही चॅनल, सोशल मिडीया आणि मोबाईलच्या जमान्यातही महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची नाळ आकाशवाणीशी जोडली गेली आहे. सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणा-या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही. हे बातमीपत्र बंद करण्यााचा निर्णय चुकीचा आणि दुर्देवी असल्याचे वृत्त निवेदकांचे म्हणणे होते.