वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे आज लोकार्पण
By admin | Published: January 6, 2015 01:06 AM2015-01-06T01:06:17+5:302015-01-06T01:06:17+5:30
साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता
लोकमतने साकारली देशातील पहिली शिल्पकृती : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
नागपूर : साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पण मंगळवार, दि. ६ जानेवारीला नागपूर येथे करण्यात येत आहे.
स्थानिक संविधान चौक (रिझर्व्ह बँकेजवळ) येथे ही शिल्पकृती उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते या शिल्पकृतीचे लोकार्पण करण्यात येईल. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्याम वर्धने उपस्थित राहतील. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. ही शिल्पकृती साकारणारे मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार किरण अदाते हेही याप्रसंगी उपस्थित राहतील.
लोकशाहीला मजबूत करण्यासाठी वृत्तपत्रांच्या खांद्याला खांदा लावून प्रवास करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देशातील वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांचे प्रतीक म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने ही शिल्पकृती देशाच्या हृदयस्थळी, झिरो माईल्सजवळ संविधान चौकात उभारण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)