वृत्तपत्राच्या पार्सल चोरट्यास अटक - बालिंग्यातील युवकास नागरिकांकडून बेदम चोप
By admin | Published: May 6, 2014 08:22 PM2014-05-06T20:22:16+5:302014-05-07T13:32:27+5:30
कोल्हापूर : रंकाळा एस. टी. स्टँड परिसरात आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास वृत्तपत्रांची पार्सल चोरणार्या तरुणास नागरिकांनी रंगेहात पकडले. यावेळी त्याची चांगलीच धुलाई करत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित प्रमोद अशोक माळी (वय ३२, रा. बालिंगा, ता. करवीर), असे त्याचे नाव आहे. त्याने वर्षभरात सुमारे २६ हजार किमतीच्या वृत्तपत्रांच्या पार्सल चोरल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, कसबा बावडा ते रंकाळा स्टँड परिसरातून वृत्तपत्रांची पार्सल चोरीला जात होती. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार घडू लागल्याने वृत्तपत्र एजंट वैतागले होते. त्यांनी या प्रकाराची माहिती वृत्तपत्र प्रशासनास दिली होती. त्यानुसार प्रशासनाने या मार्गावर पहाटेच्या दरम्यान पाळत ठेवली असता आज पहाटे पाचच्या सुमारास रंकाळा एस.टी. स्टँड परिसरातील पार्सल चोरताना प्रमोद माळीला नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम चोप देत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. वृत्तपत्राच्या प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने २०१३ ते ६ मे २०१४ पर्यंत सुमारे २६ हजार किमतीच्या पार्सल चोरल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
----------------
पार्सलची रद्दी
संशयित चोरटा प्रमोद माळी हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या कस्टडी रूममध्ये एका कोपर्यात तोंड लपवून बसला होता. पार्सल चोरटा कोण आहे, याची उत्सुकता पोलिसांनाही लागून राहिली होती. पोलिसांसह वृत्तपत्रांचे छायाचित्रकार व पत्रकार त्याला पाहण्यासाठी पुढे सरसावले असता त्याने तोंड लपवून घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण एका वृत्तपत्रात गेल्या दोन वर्षांपासून पार्सल विभागात काम करत असून, घरी जाताना रंकाळा स्टँड परिसरातील पार्सल चोरून त्याची रद्दी विकल्याचे सांगितले.
.....................................................
फोटो : ६ कोल-प्रमोद माळी (चोरटा) नावाने आहे.