वर्षअखेरीस आणखी ५० शहरांत मिळणार यूरो - ४ पेट्रोल
By admin | Published: May 10, 2014 12:02 AM2014-05-10T00:02:51+5:302014-05-10T00:02:51+5:30
सरकारकडून वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी ५० प्रमुख शहरांत यूरो ४ मानक पेट्रोल आणि डीझेलचा पुरवठा करणार आहे.
नवी दिल्ली : सरकारकडून वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी ५० प्रमुख शहरांत यूरो ४ मानक पेट्रोल आणि डीझेलचा पुरवठा करणार आहे. वर्तमान काळात यूरो ४ किंवा भारत ४ मानकाच्या पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि लखनौसह २६ शहरात करण्यात येणार आहे. यूरो ४ उत्सर्जक मानक पूर्ण करणार्या निम्नस्तर सल्फरयुक्त पेट्रोल व डिझेलची विक्री एक एप्रिल २०१०पासून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, कानपूर, आग्रा, पुणे, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ आणि सोलापूर सारख्या १३ शहरात सुरु करण्यात आली होती. उर्वरित देशात यूरो १३ किंवा बीएस ३ श्रेणीतील इंधनाचा पुरवठा केला जात होता. (लोकमत न्यूज नेटवर्क) यानंतर यूरो ४ ग्रेडच्या इंधनाचा पुरवठा आणखीन १३ शहरात करण्यात आला. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका आदेशानुसार, मंत्रालयाने वाहन इंधन धोरणाच्या शिफारशीनुसार मार्च २०१५पर्यंत ५० शहरांत बीएस ४ इंधन उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वाधिक प्रदूषित व ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखापेक्षा पुढे आहे, अशा शहरांना यासाठी पसंती देण्यात येणार आहे. या शहरांची ओळख पटविण्याकरिता अतिरिक्त व्यवस्थापक (पेट्रोलियम, नियोजन व विश्लेषण) यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तल कंपन्यांनी सांगितले की, यूरो ४ श्रेणीतील पेट्रोलवर प्रति लीटर ४१ पैसे आणि डिझेलवर २६ पैशांचा अतिरिक्त खर्च होईल. तेल कंपन्यांनी २००५ मध्ये यूरो २ आणि यूरो ३ मानक इंधनाचा पुरवठा सुरु करण्यासाठी ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)