पुढच्या वादळाची नांदी
By admin | Published: February 24, 2017 05:14 AM2017-02-24T05:14:55+5:302017-02-24T05:14:55+5:30
मुंबई महापालिकेत शिवसेना क्रमांक १चा पक्ष ठरला आहे. तर भाजपा दुसऱ्या स्थानी आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना क्रमांक १चा पक्ष ठरला आहे. तर भाजपा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसच्या जागा २०१२मध्ये ५२ होत्या त्या घसरून ३१ झाल्या आहेत. तर मनसेची मोठी घसरगुंडी होत त्यांची आकडेवारी २८ वरून ७वर आली आहे. शिवसेना-भाजपाच्या संग्रामात राष्ट्रवादीचेही नुकसान झाले. १३ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला ९वर समाधान मानावे लागले आहे. मुंबईत बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपामध्ये प्रचंड रस्सीखेच होणार आहे. भाजपाने आपल्याकडे आणखी ४ नगरसेवक असल्याचे सूतोवाच केलेले आहे. आपण क्रमांक १चा पक्ष आहोत, हे सांगण्यासाठीची धडपड आता सुरू झालेली आहे. महापौरपदावर दावा सांगण्यासाठी सुरुवातीला दावे-प्रतिदावे रंगतील. युती पुन्हा करायची झाल्यास मोठ्या तडजोडीची भाषा अर्थातच होणार आहे. शिवसेनेचा प्रयत्न भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा होता. त्यात किती यश येईल, हे समजण्यासाठी पुढचे काही दिवस जातील. शिवसेना आणि काँग्रेस जवळ आल्यास सेनेला सत्तेजवळ जाणे शक्य होईल. पण एवढे करूनही त्यांना अन्य पक्षांचीही मदत घ्यावी लागेल. मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले असले तरी तडजोड करण्यासाठी मनसेला नक्कीच महत्त्व येणार आहे. मुंबईतील संघर्ष मात्र सुरूच राहणार आहे.
मुंबई
पक्षजागा
भाजपा८२
शिवसेना८५
काँग्रेस३१
राष्ट्रवादी0९
मनसे०७