दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे बुलडाण्यात कनेक्शन; पाकिस्तानी हेरांचाही सहभाग असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:42 AM2022-03-25T08:42:06+5:302022-03-25T08:42:24+5:30

पाकिस्तानी हेरांचाही कृत्यात सहभाग असल्याचा संशय

NIA conducts searches in Gujarat, Maharashtra in espionage case | दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे बुलडाण्यात कनेक्शन; पाकिस्तानी हेरांचाही सहभाग असल्याचा संशय

दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे बुलडाण्यात कनेक्शन; पाकिस्तानी हेरांचाही सहभाग असल्याचा संशय

Next

नवी दिल्ली: हेरगिरीच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रातील बुलडाणासह गुजरातमधील विविध ठिकाणी छापे मारले आहेत. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गाेळा करण्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरांचाही या कृत्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

एनआयएकडून यासंदर्भात आंध्र प्रदेशमध्ये जानेवारी २०२०मध्ये गुन्हे दाखल करण्यता आले हाेते. त्याप्रकरणी बुलडाणा आणि गुजरातमधील गाेधरा येथील ४ ठिकाणी छापे मारले. संशयास्पद सिमकार्ड, कागदपत्रे व इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली. भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेरांनी विशाखापट्टणम, मुंबई आणि गाेव्यातील आराेपींसाेबत कट रचल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. 

कटामध्ये पाकिस्तानी हेरांचा सहभाग हाेता. बेकायदेशीरपणे भारतीय सिमकार्ड मिळविण्यात आले. त्यावर पाकिस्तानमध्ये बसलेल्या म्हाेरक्यांनी व्हाॅट्सॲप सुरू केले हाेते. त्यासाठी ओटीपी भारतातील साथीदारांनी पुरविला. याचा वापर संरक्षण खात्यातील लाेकांसाेबत संपर्क करण्यासाठी वापर करण्यात आला. त्यामध्यमातून संवेदनशील माहिती पुरविण्यात आली.

Web Title: NIA conducts searches in Gujarat, Maharashtra in espionage case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.