NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 09:03 AM2023-12-09T09:03:29+5:302023-12-09T09:04:14+5:30
राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.
दहशतवाद्यांशी संपर्क आणि कट रचल्याच्या संशयावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पहाटेपासून कारवाई करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसने छापेमारी केली.मिळालेल्या माहितीनुसार, इसिसच्या दहशतवादी कट प्रकरणात कर्नाटक आणि महाराष्ट्रात आज सकाळपासून एनआयएने एकूण ४४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.
पुण्यातील कोंढव्यात एनआयएचे छापे-
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने कोढव्यात दोन ठिकाणी छापे घालून सर्च केल्या. कल्याण येथील सादाब शेख व कॅम्पमधील अन्वर अली शेख हे कोंढव्यात भाड्याने जागा घेऊन रहात होते. एनआयएने त्यांच्या घरावर शनिवारी सकाळी छापे घातले. यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एनआयएच्या पथकाला येथे काय हाती लागले, याची माहिती मिळू शकली नाही.
Of the total 44 locations being raided by the NIA since this morning, the agency sleuths have searched 1 place in Karnataka, 2 in Pune, 31 in Thane Rural, 9 in Thane city and 1 in Bhayandar. https://t.co/vKl7119DcV
— ANI (@ANI) December 9, 2023
या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणे इसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला मोहम्मद शाहनवाज आलम दहशतवाद्याला एनआयएने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.