नायजेरीयन ड्रग डिलर जेरबंद

By admin | Published: November 12, 2016 03:43 AM2016-11-12T03:43:25+5:302016-11-12T03:43:25+5:30

अमलीपदार्थांची तस्करी शहरात जोमात सुरू असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ड्रग डिलिंगमधील एका नायजेरीन तरुणाला पाठलाग करून जेरबंद केले

Nigerian drug dealer Jerband | नायजेरीयन ड्रग डिलर जेरबंद

नायजेरीयन ड्रग डिलर जेरबंद

Next

पुणे : अमलीपदार्थांची तस्करी शहरात जोमात सुरू असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ड्रग डिलिंगमधील एका नायजेरीन तरुणाला पाठलाग करून जेरबंद केले. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात भिंतीवरून उडी मारल्याने त्याचा पाय मोडला. कोरेगाव पार्क भागात शुक्र वारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन आणि मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजेस अलोका फ्रान्सेस (३५, रा. मीरा रोड, भाइंदर, मूळ रा. नायजेरिया) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या शैलेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजेस हा ड्रग डिलिंगमध्ये सक्रिय असून शहरामध्ये तो अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत जगताप यांना मिळाली होती. त्यांनी सहायक आयुक्त सुरेश भोसले यांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क भागातील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. (प्रतिनिधी)

Web Title: Nigerian drug dealer Jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.