पोलिसांना चकविणा-या नायजेरियन तरुणाचा मृत्यू
By admin | Published: September 15, 2014 04:05 AM2014-09-15T04:05:36+5:302014-09-15T04:05:36+5:30
पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात तिस-या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झालेल्या पिंपरी चिंचवडमधील नायजेरियन गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुणे : पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात तिस-या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झालेल्या पिंपरी चिंचवडमधील नायजेरियन गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ओनेका अॅनवा बुकवा (३५, रा. अशर भुवन, फ्लॅट नं. ३०१, भाऊनगर, पिंपळे गुरव; मूळ देश : नायजेरिया) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. ओनेका याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपासून ओनेका पत्नी सोचो व तीन वर्षांच्या मुलासह अक्षरभुवन, भाऊनगर, पिंपळे गुरव येथे भाड्याने राहत होता. ओनेकावर अनेक गुन्हे नोंद असल्याने मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. दोन दिवसांपूर्वीच आनेका मुंबईहून घरी आला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी शनिवारी सापळा रचला होता. पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने घराच्या मागील बाजूस असलेली खिडकी तोडून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी उपचारासाठी त्याला नवी सांगवीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.