नायजेरियनचा महिलेला लाखोंचा गंडा

By Admin | Published: June 28, 2016 03:45 AM2016-06-28T03:45:07+5:302016-06-28T03:45:07+5:30

१५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना औरंगाबाद पोलिसांनी थेट दिल्लीत धडक कारवाई करीत मोठ्या शिताफीने अटक

Nigerian woman loses millions | नायजेरियनचा महिलेला लाखोंचा गंडा

नायजेरियनचा महिलेला लाखोंचा गंडा

googlenewsNext


औरंगाबाद : येथील महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना औरंगाबाद पोलिसांनी थेट दिल्लीत धडक कारवाई करीत मोठ्या शिताफीने अटक केली. उजेह आॅगस्टीन उगो चिक्वू आणि चुक्वीक जॉर्ज (सध्या रा. दिल्ली) अशी या विदेशी ठगांची नावे आहेत.
समर्थनगर येथील संपदा (नाव बदलेले) या ४८ वर्षीय महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवून १५ एप्रिल रोजी जेम्स ड्युकने व्हॉट्सअ‍ॅपवर संभाषण केले. स्वत:ची मरीन टूर्स नावाची ट्रॅव्हल्स एजन्सी आणि वर्ल्ड क्लास वाइल्डलाइफ अ‍ॅण्ड ग्लेसिअर क्रुइसेस ही शिपिंग कंपनी असल्याचे सांगून दिल्लीत कार्यालय सुरू करायचे असून, त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्याची आम्हाला कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करावयाची असल्याचे सांगितले. मलेशिया येथून एक पार्सल पाठवीत असून त्यात अडीच लाख अमेरिकन डॉलर,अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल आणि इतर गॅजेटस् असल्याचे त्यांना सांगितले. हे पार्सल कस्टममधून सोडविण्यासाठी आधी अडीच लाख आणि नंतर साडेचार लाख रु पये देण्यास सांगितले. संपदा यांनी ते आयसीआयसीआय बँकेतील खात्यात जमा केले. याप्रकरणी मनी लॅण्डरिंगची केस होऊ शकते, असे धमकावित भामट्यांनी पंधरा लाखांची मागणी केली. संपदा यांनी भीतीपोटी पुन्हा ९ लाख जमा केले. त्यानंतरही आणखी १५ लाखांची मागणी केली.
>दिल्लीतून अटक : सायबर क्राइम सेलच्या मदतीने दिल्लीतील छतरपूर भागातील हॉटेल्स होडल्स येथे २४ जूनच्या रात्री दोघे येणार असल्याचे समजले. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी दिल्ली पोलिसांबरोबर भामट्यांवर झडप घातली.

Web Title: Nigerian woman loses millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.