‘रातराणी’ सेवा वाढणार
By admin | Published: September 18, 2016 05:12 AM2016-09-18T05:12:12+5:302016-09-18T05:12:12+5:30
‘रातराणी’ प्रवासाला प्रवाशांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत एसटी महामंडळाने रातराणी सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला
मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्यानंतर प्रवाशांमध्ये रात्रीच्या प्रवासाची भीती निर्माण झाली होती. मात्र ‘रातराणी’ प्रवासाला प्रवाशांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत एसटी महामंडळाने रातराणी सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दिवसा धावणाऱ्या अनावश्यक लांब पल्ल्याच्या सेवा बंद करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.
रातराणी सेवा रात्री उशिरा निघून सकाळी लवकर इच्छित स्थळी कशा पोहोचतील, असे वेळापत्रकही बनविले जात असल्याचे महामंडळाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे. सध्या राज्यात एसटीच्या अवघ्या ६२६ रातराणी फेऱ्या धावतात. (प्रतिनिधी)