नऊ मार्गांवर आजपासून रातराणी
By Admin | Published: January 2, 2017 02:27 AM2017-01-02T02:27:17+5:302017-01-02T02:27:17+5:30
रात्रीच्या वेळी खासगी वाहनांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रात्र बससेवेचे पाच मार्ग वाढविण्यात आले आहेत.
पुणे : रात्रीच्या वेळी खासगी वाहनांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रात्र बससेवेचे पाच मार्ग वाढविण्यात आले आहेत. हे मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार असल्याने शहरात रातराणीचे एकूण नऊ मार्ग झाले आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून रात्रीच्या वेळी शहरात येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर या भागांत रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या भागात काही रिक्षाचालक व इतर खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतात. प्रवाशांची ही एक प्रकारे लूटच केली जाते. मात्र, इतर पर्याय नसल्याने प्रवाशांकडून पैसे दिले जातात.
या पार्श्वभूमीवर पीएमपीने रातराणीचे मार्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिवाजीनगर ते कात्रज, पुणे स्टेशन ते कात्रज,
स्वारगेट ते हडपसर आणि पुणे
स्टेशन ते हडपसर या मार्गांवर ही बससेवा सुरू होती. आता सोमवारपासून स्वारगेट ते निगडी, पुणे स्टेशन ते निगडी, पुणे स्टेशन ते कोंढवा गेट, स्वारगेट ते धायरी आणि पुणे स्टेशन ते वाघोली हे पाच नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहोत.
ही सेवा रविवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारपासून सुरू
केली जाणार आहे.
या बससेवेचा तिकीटदर नियमित तिकीटदरापेक्षा केवळ पाच
रुपये अधिक असेल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मार्ग व सुटण्याच्या वेळा
१) शिवाजीनगर ते कात्रज : शिवाजीनगरहून - ००.१०, ०१.२०, ०२.४५, ०४.२०, ०५.२०. कात्रजहून - २३.३०, ००.४५, ०२.१५, ०३.४५, ०४.५०.
२) पुणे स्टेशन ते कात्रज : पुणे स्टेशनहून - २३.५०, ०१.२०, ०२.४०, ०४.१० (स्वारगेटपर्यंत), ०५.०५. कात्रजहून - २३.००, ००.३०, ०२.००, ०३.२०, ०४.३५ (स्वारगेटपासून). ३) स्वारगेट ते हडपसर : स्वारगेटहून - २१.४०, २३.००, २४.२०, ०१.४०, ०४.३०. हडपसरहून - २१.००, २२.२०, २३.४०, ०१.००, ०३.५५.
४) पुणे स्टेशन ते हडपसर : पुणे स्टेशनहून - २३.४०, ०१.१०, ०२.२०, ०४.००, ०५.१०.
५) स्वारगेट ते निगडी (वाकडेवाडीमार्गे) :
स्वारगेटहून - २३.४५, ००.४५, ०१.४५, ०२.४५, ०४.००, ०५.००.
निगडीहून - २३.४५, ००.४५, ०१.४५, ०२.४५, ०४.००, ०५.००.
६) पुणे स्टेशन ते निगडी (औंधमार्गे) : पुणे स्टेशनहून - २३.०५, ००.१०, ०१.१५, ०२.२०, ०३.३०, ०४.३५.
निगडीहून - २३.०५, ००.१०, ०१.१५, ०२.२०, ०३.३०, ०४.३५.
७) पुणे स्टेशन ते कोंढवा गेट : पुणे स्टेशनहून - २३.००, ०१.३०, ०३.५५.
कोंढवा गेटहून - ००.१५, ०२.४५, ०५.३५.
८) स्वारगेट ते धायरी : स्वारगेटहून - ००.४५, ०२.१०, ०३.३०, ०५.००.
धायरीहून - ०१.२५, ०२.५०, ०४.१०, ०५.४०.
९) पुणे स्टेशन ते वाघोली :
पुणे स्टेशनहून - २३.१५, २४.००, ००.४५, ०१.३०, ०२.४५, ०३.३०, ०४.१५, ०५.००. वाघोलीहून - २४.००, ००.४५, ०१.३०, ०२.१५, ०३.३०, ०४.१५, ०५.००,०५.४५.