कृषिक्रांती घडविणारे नाईक द्रष्टे नेते
By admin | Published: August 19, 2015 01:00 AM2015-08-19T01:00:49+5:302015-08-19T01:00:49+5:30
नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आग्रही भूमिका घेत कृषी क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक खऱ्या
पुसद (यवतमाळ) : नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आग्रही भूमिका घेत कृषी क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक खऱ्या अर्थाने द्रष्टे नेते होते, असे प्रतिपादन महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रगतशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांचा दिवस रात्र विचार करणारे वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडविली. तर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलक्रांती आणली, असे असताना यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या का करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. शासन सर्व काही देत असताना लोकसहभागाशिवाय प्रगती होणार नाही असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)