मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नाही: निलेश राणेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:00 AM2020-02-19T10:00:41+5:302020-02-19T10:02:16+5:30
मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्यात एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला गेला नाही.
मुंबई : नाणार प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तर त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नसल्याचा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
निलेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्या निमत्ताने घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत एकही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारने कोकणातील विकास कामांना दिलेल्या स्थगितीवर सुद्धा निर्णय घेण्यात आला नाही.
तर मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्यात एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला गेला नाही. तर कोकण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी साधी पत्रकार परिषद सुद्धा घेतली नसल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यामुळे अंगणेवाडीत भाविकांची गैरसोय झाली असल्याचा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा सिंधुदुर्ग दौरा
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 18, 2020
*जिल्हा नियोजन आढावा बैठकीत एकही निर्णय नाही
*कोकणातील विकास कामांना दिलेल्या स्थगीतीवर निर्णय नाही
*निर्णय घेण्याची धमक नाही तर आढावा का?
*एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला नाही.
*पत्रकार परिषद नाही.
*मुख्यमंत्र्यामुळे अंगणेवडीत भाविकांची गैरसोय