बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नाही : निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:01 PM2020-02-06T15:01:19+5:302020-02-06T15:07:58+5:30
माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. तर आता यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नसल्याचे म्हणत सरकार मधून बाहेर पडण्याचे आवाहन राणे यांनी केलं.
आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतानी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं होत. सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते.
यावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात, मग शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत का रहातात ?.. तर राजीनामा देऊन वेगळे व्हा, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ ह्या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकार मध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता... राजीनामा देऊन वेगळे व्हा. https://t.co/LopiZOC1v0
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 6, 2020