मातोश्रीला पैसे पाठवणारेच मंत्री होणार : निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:04 PM2019-05-30T18:04:09+5:302019-05-30T18:07:19+5:30
दुसरीकडे महाराष्ट्राच्या वाट्याला किती केंदीय मंत्रीपद मिळणार याची चर्चा राज्याच्या राजकरणात सुरु आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, त्यांच्या शपथविधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, शिवसेनला केंद्रात मिळणाऱ्या मंत्रीपदावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', असं ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेनेकडून मुंबईचे खासदार अरविंद सावंत केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्याआधीच राणे यांनी ही टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या वाट्याला किती केंदीय मंत्रीपद मिळणार याची चर्चा राज्याच्या राजकरणात सुरु आहे. त्यातच, शिवसेनला मिळणाऱ्या केंद्रीय मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनाचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. 'जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार, यालाच उद्धव ठाकरे म्हणतात' असं ट्वीट त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या बातमीला उत्तर देताना केलं आहे.
जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार... यालाच म्हणतात उद्धव ठाकरे. https://t.co/kUP8BOgWPs
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 30, 2019
शिवसेनेतून कुणाला मंत्रिपद दिलं जातं याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पण यामुळे यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी नाराज असल्याचं कळतंय. भावना गवळी यांचा ऐनवेळी पत्ता कट झाल्याने त्या नाराज असून शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.