"टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’’ निलेश राणेंचा बोचरा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 03:30 PM2021-11-09T15:30:02+5:302021-11-09T15:32:38+5:30

Nilesh Rane News: निलेश राणे यांनी Mahavikas Aghadi मधील नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. तसेच टाईमपास होत नसेल तर Bigg Bossमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.

Nilesh Rane's Attack on Mahavikas Aghadi leader, Says, 'If time is not running out then go to Bigg Boss | "टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’’ निलेश राणेंचा बोचरा टोला 

"टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’’ निलेश राणेंचा बोचरा टोला 

Next

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नेहमीच प्रक्षोभक भाषेत टीका करत असतात. त्यातून ते वेळोवेळी अनेक वादांनाही निमंत्रण देत असतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा निलेश राणे यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. तसेच टाईमपास होत नसेल तर बिग बॉसमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.

निलेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्यासारखे शायरी टाकून देतात. एक मंत्री कव्वाली गातात. गुहागरचे नेते मिमिक्री करतात. कोणी डान्सर नाचवतात. टाईमपास होत नसेल तर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावे, जर घेतलं तिथे तर. कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाहीत.

दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपाचे नेते नीलेश राणे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यानंतर शिवसैनिक त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

Web Title: Nilesh Rane's Attack on Mahavikas Aghadi leader, Says, 'If time is not running out then go to Bigg Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.