आनंद दिघेंची हत्या करून मृत्यू झाल्याचं भासवलं, निलेश राणेंचा बाळासाहेबांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 09:06 PM2019-01-14T21:06:17+5:302019-01-14T21:09:59+5:30

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Nilesh Rane's serious allegations against Balasaheb | आनंद दिघेंची हत्या करून मृत्यू झाल्याचं भासवलं, निलेश राणेंचा बाळासाहेबांवर गंभीर आरोप

आनंद दिघेंची हत्या करून मृत्यू झाल्याचं भासवलं, निलेश राणेंचा बाळासाहेबांवर गंभीर आरोप

googlenewsNext

रत्नागिरी- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असून, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.

एवढ्यावरच न थांबता निलेश राणेंनी अनेक घणाघाती आरोप केले आहेत. कर्जतच्या फार्म हाऊसवरही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून दोन शिवसेनेच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असं म्हणत निलेश राणेंनी बाळासाहेबांवर निशाणा साधला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. निलेश राणे यांनी केलेले आरोप जसेच्या तसे देण्यात आले आहेत.

“आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. राणे साहेबांनीही पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलंय, त्याबद्दल कधी बोललो नाही. कारण आम्हाला आमची मर्यादा माहित होती. आणि आमचे राणेसाहेब बाळासाहेबांवर आजही एवढे प्रेम करतात, की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून, मी त्यांना साहेब जरी म्हणत असलो, तरी ते आधी माझे वडील आहेत. त्यांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल, तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल.
आनंद दिघेंचं खरं काय झालं? कट कसा रचला गेला आणि त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं. आणि हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. त्या शिवसैनिकांना ठार मारायाचा बाळासाहेबांनी कुणाला आदेश दिला आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. जे दिघेसाहेबांबद्दल झालं, ते चुकीचं वाटलं शिवसैनिकांना म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन त्या दोघांना ठार मारलं गेलं.
मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, मात्र राणेसाहेबांबद्दल जर कुणी खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, तर मी सहन करणार नाही. माझ्यासाठी राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, बाळासाहेब माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. जेवढी मर्यादा आम्ही ठेवली होती, ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर ठेवली नाही.
त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही. घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते. काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं, हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन.
बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर? हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. बाळासाहेबांनी केलं, त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. पण आमच्या राणेसाहेबांचा मानसन्मान कुणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होतं. आम्हाला काही फरक पडत नव्हता. पण असे गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) बोलायला लागले, तर आम्ही गप्प बसायचं?

Web Title: Nilesh Rane's serious allegations against Balasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.