नऊ अट्टल दरोडेखोरांना गडचिरोलीत अटक

By admin | Published: July 16, 2016 11:03 PM2016-07-16T23:03:04+5:302016-07-16T23:03:04+5:30

गडचिरोली व अन्य ठिकाणी दरोडा घालण्यासाठी आलेल्या नऊ अट्टल सशस्त्र दरोडेखोरांना झायलो गाडीसह गडचिरोली पोलिसांनी गुरुवारी(ता.१४)रात्री अटक केली.

Nine Atal Dacoits arrested in Gadchiroli | नऊ अट्टल दरोडेखोरांना गडचिरोलीत अटक

नऊ अट्टल दरोडेखोरांना गडचिरोलीत अटक

Next

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. १६ - गडचिरोली व अन्य ठिकाणी दरोडा घालण्यासाठी आलेल्या नऊ अट्टल सशस्त्र दरोडेखोरांना झायलो गाडीसह गडचिरोली पोलिसांनी गुरुवारी(ता.१४)रात्री अटक केली.
पंकज रवी साखरे(२६) रा. साखरा ता.गडचिरोली, दिनेश सुभाष गायकवाड(३८) रा.गडचिरोली, मोहम्मद इम्रान ताज खाँ (२४), फिरोज खाँ(२६), सुशील मधुकर चव्हाण(२५), राज रामानंद आर्या(२९), अजहर शेख रफिक शेख(२४), झिशान खाँ मुरस्तदी खाँ(२५), समीर शाहिद खाँ(२६) व अरमान सिद्दीकी(सर्व रा.नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी रात्री नऊ जण धानोरा मार्गावरील हॉटेल वैभवमधील कॅफेमध्ये बसले होते. हे दरोडेखोर असल्याची कल्पना येताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांना कुणीतरी मोबाईलवरुन माहिती दिली. लागलीच डॉ.कवडे यांनी पोलिस ताफ्यासह हॉटेल वैभव गाठले. तेथे संशयास्पद स्थितीत असलेल्या नऊ जणांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तोल, एक एअर पिस्तोल, एम.एच ३१ डी.सी. ७८३८ क्रमांकाची महिंद्रा झायलो गाडी, दोन लोखंडी धारदार कत्ते, एक गुप्ती, एक कुऱ्हाड, एक रॉड व तब्बल १४ मोबाईल ताब्यात घेतले. उपरोक्त १० आरोपींपैकी ९ जणांना अटक करण्यात आली असून, अरमान सिद्दीकी हा फरार आहे. अटकेतील आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सतर्कतेने दरोडेखोरांचे मनसुबे अयशस्वी केल्याने पोलिसांचे अभिनंदन होत आहे

Web Title: Nine Atal Dacoits arrested in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.