ओडिशाच्या 'त्या' नऊ मुलींची बालसुधारगृहात रवानगी

By admin | Published: July 12, 2016 04:47 PM2016-07-12T16:47:01+5:302016-07-12T16:47:01+5:30

ओडिशाहून मुंबईकडे निघालेल्या अल्पवयीन नऊ मुलींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Nine girls from Odisha will be sent to the nursery home | ओडिशाच्या 'त्या' नऊ मुलींची बालसुधारगृहात रवानगी

ओडिशाच्या 'त्या' नऊ मुलींची बालसुधारगृहात रवानगी

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 12 - सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओडिशाहून मुंबईकडे निघालेल्या अल्पवयीन नऊ मुलींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्या नऊ मुलींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती लोहमार्गचे पोलीस उपनिरीक्षक टी.के. वहिले यांनी दिली़
ओरिसा राज्यातील आजूबाजूच्या गावातील १४ ते १७ वयोगटातील अल्पवयीन नऊ मुलींना देहविक्रीसाठी एक इसम कोणार्क एक्सप्रेसने मुंबईला घेऊन जात असल्याची माहिती रेल्वे पोलीस व गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनुसार शहर पोलीस व लोहमार्ग पोलीसांनी सापळा लावला होता़ त्यानंतर सोमवारी रात्री सातच्या सुमारास त्या नऊ मुलींना ताब्यात घेतले.
सदर बझार पोलीस ठाण्यात मुलींची रात्री उशीरा पर्यंत चौकशी करण्यात आली होती.त्यानंतर या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरोपी संतोष नाईक (रा. आरीसा ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या एका मुलींची मावशी ही त्यात असल्याचे चौकशी दरम्यान निर्देशनास आले आहे. सदर मुलींना ओरीसा राज्यातून मुंबईला नेहण्या आधी त्याने प्रत्येक मुलीला कपडे व ओळखीसाठी आधारकार्ड घेण्यांचे सांगितले होते. मुलीचे आई वडील हे संतोष नाईक ला ओळखत असल्याचे प्राथमिक तपासातुन दिसून आले.
---------------------
आई व वडिलांना विचारून आणले...
संतोष नाईक याने सदर मुलींच्या आई वडीलांचा विश्वास संपादन करुन त्या मुलींना मुंबईत नोकरी लावतो व त्यांचे शिक्षण शिकवितो असे सांगितले. अशी माहिती चौकशी दरम्यान एका मुलींनी लोहमार्ग पोलीसांना मंगळवारी दिली आहे.
----------------
मुलींकडे आधार कार्ड सापडले
लोहमार्ग पोलिसांना चौकशी दरम्यान त्यातील काही मुलीकडे आधारकार्ड सापडले आहे. त्या आधार कार्डवरुन पोलीस त्यांच्या मुळ गावचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेची माहिती लोहमार्ग पोलीसांनी ओरीसा पोलिसांना कळविणार आहेत. तसेच चौकशी दरम्यान एका मुलींकडे नातेवाईक़ांचा फोन नंबर सापडला आहे.
-----------------
आरोपी संतोष नाईकचा फोन बंद
त्या मुलींनी फरार आरोपी संतोष नाईक याचा फोन नंबर लोहमार्ग पोलिसांना दिला आहे. मात्र त्याचा फोन बंद असल्यामुळे पोलीसांना त्याचे लोकेशन ही सापडत नाही. त्यांच्या फोन नंबर होऊन शोध घेण्याचे काम सुरु आहे.
----------------
संतोष असा झाला फरार
सोलापूर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस ही गाडी थांबली असता, त्यावेळी आरोपी संतोष नाईक हा पाणी आण्यासाठी खाली उतरला होता, त्याच दरम्यान पोलिसांनी रेल्वे डब्यातील मुलींना ताब्यात घेतल्याचे आरोपींने पाहिले अन् फरार झाला असावा असा अंदाज लोहमार्ग पोलीसांनी व्यक्त केला आहे.
-------------------
सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू
संतोष नाईक यांने प्राथमिक माहिती नुसार त्यांने पिवळा कलरचा टि शर्ट घातला होता. रेल्वे स्थानकार ठिकाणी सीटीव्ही कॅमेरे असल्याने तो नेमका कसा दिसतो, त्याचे छायाचित्र मिळवण्यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलीस रेल्वेस्थानकारवरील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहेत.
---------------

त्यातील एका मुलींची बहिण केरळला
ओरीसा राज्यातील एका मुलींची बहिण काही दिवस मुंबईला होती, तिचे लग्न झाले असून ति सद्या केरळ मध्ये आहे. अशी माहिती त्या मुलींने लोहमार्ग पोलिसांना दिली आहे.
-------------------
लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा
रेल्वे स्थानकार ओरीसा राज्यातील त्या नऊ मुलींना सोलापूर गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चौकशी केली. हा गुन्हा रेल्वे स्थानकावरील असल्याने तो लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त शर्मिष्ठा वालवलकर यांनी दिली.
---------------
सर्वच मुली गरीब घरच्या
ओरीसा राज्यातील त्या नऊ मुली अत्यंत गरीब घरच्या आहेत. त्यांचे आई व वडील दुसऱ्यांच्या घरी कामाला आहेत. तर एका मुलींनी गरीबीला कंटाळून शाळा सोडल्याचे तिने सांगितले. दरम्यान पोलिसांना त्या मुलींशी भाषा समजत नसल्याने तपासकामात अडथळे निर्माण होत आहेत.
 

Web Title: Nine girls from Odisha will be sent to the nursery home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.