डीआरआयकडून नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, काँग्रेस पदाधिका-यांसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 08:34 PM2017-10-08T20:34:26+5:302017-10-08T20:34:35+5:30

भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपये किमतीच्या तब्बल नऊ लाखांच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या.

Nine lakh fake currency seized by DRI, three officials including Congress office bearers arrested | डीआरआयकडून नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, काँग्रेस पदाधिका-यांसह तिघांना अटक

डीआरआयकडून नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, काँग्रेस पदाधिका-यांसह तिघांना अटक

Next

मुंबई : भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपये किमतीच्या तब्बल नऊ लाखांच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या. याप्रकरणी पश्चिम उपनगरातील एका काँग्रेसच्या पदाधिकारी व बिल्डरासह तिघा जणांना अटक केली. हाजी इम्रान शेख, हालीम चंदानी व झाहीद शेख अशी त्यांची नावे असून, रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी मिळाली. तिघांनी या नोटा कोठून मिळविल्या, या रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याचे ‘डीआरआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने बाजारात आणलेल्या दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा समाजकंटकांनी खपविण्यासाठी बाजारात आणल्या आहेत. त्याविरुद्ध पोलिसांबरोबरच महसूल संचालनालयाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)येथील मॅकडोनाल्डच्या परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती डीआरआय गुप्तचर विभागातील अधिका-यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगेत पाचशे रुपये किमतीच्या ९ लाखांच्या बनावट नोटा मिळून आल्या. अटक केलेला शेख हा काँग्रेस ब्लॉक कमिटी जनरल सेक्रटरी आहे तर हालीमचंदानी हा बांधकाम व्यावसायिक असून त्यांची उपनगरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहे.

झाहीद शेख बनावट नोटा खपविण्यासाठी त्यांना सहकार्य करीत होता. असे अधिका-यांंकडून सांगण्यात आले. हालीमचंदानी याच्यावर यापूर्वीही फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. बनावट रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत, त्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.
-------------
महिन्यात तिसरी कारवाई
डीआरआयच्या पथकाकडून बनावट नोटाविरुद्ध मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात ही तिसरी कारवाई असून आतापर्यत एकुण २४ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. पहिल्या दोन कारवाईमध्ये दोन हजार रुपयाच्या प्रत्येकी साडेसात लाखाच्या नोटा पकडल्या होत्या. ही मोहीम यापुढेही कायम राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Nine lakh fake currency seized by DRI, three officials including Congress office bearers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.