त्र्यंबकच्या अंबोली शिवारात नऊ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 07:41 PM2017-11-20T19:41:00+5:302017-11-20T19:44:16+5:30

Nine lakhs of illegal liquor bars were seized in Trimbakesh's Amboli Shivar | त्र्यंबकच्या अंबोली शिवारात नऊ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

त्र्यंबकच्या अंबोली शिवारात नऊ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Next
ठळक मुद्देदमननिमित्त विदेशी मद्याची अवैध वाहतूकराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

नाशिक : दमननिमित्त विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणा-या बोलेरो वाहनास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (दि़२०) त्र्यंबकेश्वरजवळील अंबोली शिवारात पकडले़ विदेशी मद्य व वाहन असा सुमारे नऊ लाखांचा हा मुद्देमाल असून पिकअपचालक वाजिद पापामिया सय्यद (रा़देवळाली कॅम्प) यास अटक केली आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकास त्र्यंबकेश्वर शिवारातील अंबोली फाटा परिसरातून अवैध मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीनुसार सोमवारी (दि़२०) अंबोली फाटा तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या वाहन तपासणीत संशयित वाजिद पापामिया सय्यद (रा़देवळाली कॅम्प) याच्या ताब्यातील महिंद्र बोलेरो पिकअपची (एमएच १५, एफव्ही २६९९) तपासणी केली़ त्यामध्ये दमननिर्मित मॅकडोवेल व्हिस्की १८० मिली (२४० बाटल्या), मॅकडोवेल व्हिस्की ७५० मिली (२४ बाटल्या), मॅकडोवेल रम १८० मिली (४८ बाटल्या), , मॅकडोवेल रम ७५० मिली (४२ बाटल्या), आॅफीसर चॉईस ब्ल्यू व्हिस्की १८० मिली (४८ बाटल्या), ब्लेंडर्स प्राईड व्हिस्की ७५० मिली (४२ बाटल्या), आॅफिसर चॉईस व्हिस्की ७५० मिली (१२ बाटल्या), रॉयल टॅग व्हिस्की ७५० मिली (२४ बाटल्या), सिग्नेचर व्हिस्की ७५० मिली (६ बाटल्या), किंगफिशन बिअर ७५० मिली (१२० बाटल्या) आढळून आल्या़ पिकअप वाहन व मद्यसाठा असा ८ लाख ८६ हजार ४८० रुपयांचा हा मुद्देमाल असून संशयित सय्यदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी़बी़राजपूत, उपअधीक्षक जी़व्ही़बारगजे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक व्ही़एग़ोसावी, दुय्यम निरीक्षक पी़एसक़डभाने, जवान व्ही़टीक़ुवर, विरेंद्र वाघ, एसक़े़पाटील, व्ही़आऱसानप यांनी ही कारवाई केली़
 

Web Title: Nine lakhs of illegal liquor bars were seized in Trimbakesh's Amboli Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.