डेप्युटी आरटीओच्या नऊ कार्यालयांचा दर्जा वाढणार; सुधारित आकृतिबंध; सहा. माेटार निरीक्षकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 12:47 PM2022-09-09T12:47:25+5:302022-09-09T12:49:25+5:30
राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे.
नांदेड : विविध वाहनांचे पासिंग, ओव्हरलाेड वाहतूक राेखणे, महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावणे आदी प्रमुख जबाबदारी असलेल्या प्रादेशिक परिवहन खात्यात मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध सादर करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक फटका हा सहायक माेटार वाहन निरीक्षक व लिपिक टंकलेखकांना बसणार आहे. त्याचवेळी डेप्युटी आरटीओची नऊ कार्यालये अपग्रेड केली जाणार आहेत.
राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. परिवहन खात्याने या आकृतिबंधाला ग्रीन सिग्नल दिला असून, आता ताे मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे गेल्याचे सांगितले जाते.
परिवहन विभागात राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ४ हजार २३५ पदे मंजूर आहेत; परंतु नव्या आकृतिबंधात ही संख्या तब्बल ३८२३ वर आणण्यात आली आहे. त्यात ४१२ ने घट झाली आहे. त्याचवेळी वाढलेली पदे व कमी झालेली पदे याची संख्या १ हजार ४० एवढी आहे. यात काही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची व लिपिकवर्गीय पदे वाढली, तर कनिष्ठ अधिकाऱ्यांची कमी झाल्याचे दिसून येते.
सर्वाधिक फटका हा लिपिक टंकलेखक-सहा. राेखपाल-कर अन्वेषक यांच्या ५२२ पदांना बसला आहे. त्या खालाेखाल सहायक माेटार वाहन निरीक्षकांची २०४ पदे नव्या आकृतिबंधात घटली आहेत. सहपरिवहन आयुक्तांची पाच, आरटीओची १२, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तब्बल ७४ पदे वाढली आहेत.
ही कार्यालये हाेणार अपग्रेड
राज्यात १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. त्यात आता आणखी नऊची भर पडणार आहे. पिंपरी चिंचवड, जळगाव, साेलापूर, अहमदनगर, पालघर, चंद्रपूर, अकाेला, बाेरिवली व सातारा या डेप्युटी आरटीओ कार्यालयांचा दर्जा वाढवून ताे आता आरटीओचा करण्याचे प्रस्तावित आहे.
अशी असेल रचना -
सध्याची मंजूर पदे प्रस्तावित पदे कमी/वाढ
परिवहन आयुक्त
०१ ०१ ००
अपर परिवहन आयुक्त
०१ ०१ ००
सहपरिवहन आयुक्त
०१ ०६ ०५
प्रादे. परिवहन अधिकारी
१६ २८ १२
उपप्रादेशिक अधिकारी
५६ ६० ०४
सहा. परिवहन अधिकारी
१०० १७४ ७४
माेटार वाहन निरीक्षक
८६७ ८६७ ००
सहा. वाहन निरीक्षक
१३०२ १०९८ -२०४
प्रशासकीय अधिकारी
१७ ६६ ४९
कार्यालय अधीक्षक
६६ १७९ ११३
वरिष्ठ लिपिक
३८३ ४४० ५७
टंकलेखक
१४२५ ९०३ -५२२
एकूण
४२३५ ३८२३ १०४०