बीसीसीआयप्रकरणी नऊ शिवसैनिकांना अटक
By admin | Published: October 21, 2015 03:21 AM2015-10-21T03:21:56+5:302015-10-21T03:21:56+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वानखेडे स्टेडियमवरील कार्यालयात पाकिस्तानच्या निषेधार्थ धुडगूस घातल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी मंगळवारी आणखी नऊ
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वानखेडे स्टेडियमवरील कार्यालयात पाकिस्तानच्या निषेधार्थ धुडगूस घातल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी मंगळवारी आणखी नऊ शिवसैनिकांना अटक केली. शाखाप्रमुख संतोष वीर (वय ४०), किरण बालेसराफ (४३), मनोहर पाटील (५०), सिद्धेश मंडगावकर (३०), शिवसैनिक विजय सुर्वे (६५), धर्मेश मिश्रा (३८), मनीष सुर्वे (३७) व गुलाब उग्रेज (३०) त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांवर जामिनावर सुटका करण्यात आली.
भारत-पाक क्रिकेट मालिकेप्रकरणी चर्चेसाठी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्यासमवेत बैठक होणार होती. मात्र शिवसेनेने त्याला विरोध करीत बैठक उधळून लावली. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी १० शिवसैनिकाना अटक केली होती.