नऊ तृतीयपंथीही यंदा देणार सीईटी!
By admin | Published: April 18, 2017 05:52 AM2017-04-18T05:52:48+5:302017-04-18T05:52:48+5:30
तंत्रशिक्षण अभ्यासक्र मांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) यंदा ३ लाख ८९ हजार अर्ज दाखल झाले आहेत
प्राची सोनवणे , नवी मुंबई
तंत्रशिक्षण अभ्यासक्र मांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) यंदा ३ लाख ८९ हजार अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ९ तृतीयपंथीयांनीही यंदा सीईटीसाठी अर्ज केले आहेत.
परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे लिंग लिहिताना स्त्री- पुरु ष यांच्याबरोबर ‘इतर’ असा पर्यायही उपलब्ध करून देण्याचे आदेश केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार हा पर्याय गेल्या वर्षीपासून उपलब्ध करून देण्यात आला. मात्र गेल्या वर्षी त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. यंदा परीक्षा अर्जात नऊ विद्यार्थ्यांनी ‘इतर’ पर्याय निवडला आहे. राज्यभरातील १ हजार ११० केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. यंदा सीईटीसाठी आलेल्या अर्जांत ८० हजारांची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या तारखा
२४ एप्रिल- प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
११ मे - सीईटी परीक्षेची तारीख
४ जूनपूर्वी- निकाल जाहीर केला जाईल.