नऊ महिन्याच्या बाळाच्या नशिबी कारागृह !

By admin | Published: January 1, 2015 12:35 AM2015-01-01T00:35:24+5:302015-01-01T00:35:24+5:30

शिक्षा भोगणारी आजीच करते संगोपन; : आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुनत आजी भोगतेय शिक्षा.

Nine-year-old baby jailed! | नऊ महिन्याच्या बाळाच्या नशिबी कारागृह !

नऊ महिन्याच्या बाळाच्या नशिबी कारागृह !

Next

नीलेश शहाकार/बुलडाणा : आईने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली.. वडील अपंग आणि आजोबा दृष्टीहीन, आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुनत आजी शिक्षा भोगतेय. अशा विपरीत परिस्थितीत कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर !
संवेदनशील माणसाच्या हदयाला पाझर फोडणारे हे वास्तव आहे, बुलडाणा जिल्हा कारागृहातील. जिलतील चिखली तालुक्यातील कनकखुर्द येथील प्रमिला वसंत जाधवने मुलाच्या लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात सुनेचा हुंड्यासाठी छळ सुरु केला. या छळाला कंटाळून या बाळाचाही विचार न करता विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने सुनेचा छळ आणि हत्येस कारणातून ठरवून आजी प्रमिला जाधवसह कुटूंबातील चार सदस्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व १२ डिसेंबर २0१४ ला कारागृहात रवानगी केली. अपंग वडील व दृष्टीहीन आजोबा नऊ महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यास असर्मथ असल्याने त्याला सांभाळण्याची जबाबदारी आजीवर आली. शेवटी तो निरागसही कुठलाही गुन्हा न करता आजीसोबत कारागृहात बंदिस्त आहे.
. नऊ महिन्यांच्या बाळासाठी कपडे व खेळणी पुरविले जातात. शिवाय या चिमुकल्याशी सर्वांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. शेवटी कर्तव्यासमोर काही गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात आणि नियम व कायद्याचे पालनही करावे लागत असल्याचे कारागृह पोलिस अधिक्षक आशिष गोसावी यांनी सांगीतले.

Web Title: Nine-year-old baby jailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.