नऊ वर्षांच्या लढाईचा करुण अंत !
By admin | Published: July 8, 2015 02:13 AM2015-07-08T02:13:52+5:302015-07-08T02:13:52+5:30
२००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.
७/११ बॉम्बस्फोटातील पीडित पराग यांचा मृत्यू
मुंबई : २००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. बुधवार, ८ जुलैला दुपारी १च्या सुमारास पराग यांच्या पार्थिवावर भार्इंदर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासादरम्यान ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात पराग यांच्या मेंदूला जबर मार बसला होता. १२ जुलै २००६ रोजी पराग यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या मेंदूवर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन दिवसांनी त्यांच्या मेंदूवर अजून एक शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर सलग दोन वर्षे पराग कोमात होते. यानंतर आश्चर्यजनकरीत्या त्यांनी डोळे उघडले, हाक मारल्यावर मान वळवून प्रतिसाद देत होते. पण यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. ते अर्ध संवेदना जागृतावस्थेत (५ीॅी३ं३्र५ी २३ं३ी) स्थितीत होते.
मंगळवार, ७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता पराग यांची सामान्य तपासणी करण्यात आली, तेव्हा सर्व ठीक होते. यानंतर थोड्याच वेळात पराग यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे त्यांच्या आईला जाणवले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.