Nipah Virus: धोका वाढला! राज्यातील वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच 'निपाह' विषाणू आढळला; मृत्यूदर ६५% असल्यानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:20 AM2021-06-22T10:20:26+5:302021-06-22T10:22:26+5:30

Nipah Virus: राज्यात कोरोना संकट असताना आता निपाह विषाणूदेखील आढळून आला; साताऱ्यातील गुफांमध्ये आढळला निपाह विषाणू

Nipah virus found in two bat species first time in Maharashtra by NIV team | Nipah Virus: धोका वाढला! राज्यातील वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच 'निपाह' विषाणू आढळला; मृत्यूदर ६५% असल्यानं चिंतेत भर

Nipah Virus: धोका वाढला! राज्यातील वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच 'निपाह' विषाणू आढळला; मृत्यूदर ६५% असल्यानं चिंतेत भर

Next

मुंबई/पुणे: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी सध्या राज्यभरात लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. राज्यातील वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे.

पुण्यातून गुड न्यूज! कोरोनाविरोधात जुनंच शस्त्र येणार कामी, लहान मुलांसाठी ठरणार संजीवनी

निपाह विषाणू असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली. देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट लस, रोगप्रतिकारशक्तीलाही देऊ शकतो चकवा? तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूची लागण झाल्यानंतरचा मृत्यूदर खूप जास्त आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बहुतांश जण बरे होतात. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे. तर मृत्यूदर १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान आहे. निपाहवर औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे.

गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते. कोरोना विषाणूच मूळदेखील वटवाघळांमध्येच असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

निपाह विषाणूचा सर्वप्रथम १९९८-९९ साली मलेशियात आढळून आला. डुकरं आणि डुकरांची काळजी घेणाऱ्यांमध्ये तेव्हा हा विषाणू आढळून आला. त्यावेळी मृत्यूदर ४० टक्के होता. २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत निपाह आढळला. यानंतर २००७ मध्ये पश्चिम बंगालच्याच नाडिया जिल्ह्यात निपाह आढळला. २०१८ मध्ये केरळच्या कोझिकोडेत निपाहमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा कोझिकोडेत निपाह आढळून आला.

Read in English

Web Title: Nipah virus found in two bat species first time in Maharashtra by NIV team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.