निरंकारीप्रमुख हरदेव सिंग यांचे अपघाती निधन

By admin | Published: May 14, 2016 03:19 AM2016-05-14T03:19:40+5:302016-05-14T03:19:40+5:30

आध्यात्मिक नेते व निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग (६२) यांचे कॅनडात माँट्रियल येथे शुक्रवारी अपघाती निधन झाले, असे निरंकारी पंथाचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख कृपासागर यांनी सांगितले.

Nirankari chief Hardev Singh passes away | निरंकारीप्रमुख हरदेव सिंग यांचे अपघाती निधन

निरंकारीप्रमुख हरदेव सिंग यांचे अपघाती निधन

Next

माँट्रियल : आध्यात्मिक नेते व निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग (६२) यांचे कॅनडात माँट्रियल येथे शुक्रवारी अपघाती निधन झाले, असे निरंकारी पंथाचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख कृपासागर यांनी सांगितले.
बाबा हरदेव सिंग हे कारने प्रवास करीत असताना शुक्रवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ५च्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. ते कॅनडामध्ये आध्यात्मिक बैठका घेण्यासाठी गेले होते. टोरोंटोमध्ये जून महिन्यात दुसरे निरंकारी आंतरराष्ट्रीय संगम आयोजित करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंग हे ‘निरंकारी बाबा’ या नावाने ओळखले जात. ते निरंकारी मिशनचे प्रमुख होते. १९८०मध्ये त्यांनी त्यांचे वडील गुरुबचन सिंग यांची हत्या झाल्यानंतर मिशनच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेतली होती.
>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हरदेव सिंग यांचा अतिशय दु:खदायक अंत हा आध्यात्मिक चळवळीची हानी असल्याची प्रतिक्रिया टिष्ट्वटरद्वारे व्यक्त केली. माझ्या भावना दु:खद प्रसंगी त्यांच्या असंख्य अनुयायांसोबत आहेत, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हरदेव सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

Web Title: Nirankari chief Hardev Singh passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.