कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन महास्वामी यांचे निर्वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:05 AM2019-06-20T11:05:17+5:302019-06-20T14:29:00+5:30

कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश, जैन तत्वज्ञानाचा प्रचार, धर्म आणि अध्यात्मातून सामाजिक उन्नती, मठाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यीक चळवळीचे प्रणेते, उच्च विद्याविभूषित व डॉक्टरेटची पहिली पदवी मिळवलेले स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय ७८) यांचे गुरूवारी पहाटे महानिर्वाण झाले. त्यांच्या निधनानंतर जैन समाजाचे चैतन्य हरवल्याची भावना व्यक्त झाली. 

 Nirvana of Laxmisena Mahaswamy of Kolhapur | कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन महास्वामी यांचे निर्वाण

कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन महास्वामी यांचे निर्वाण

googlenewsNext
ठळक मुद्दे कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन महास्वामी यांचे निर्वाणमहावीर यांच्या अहिंसा, शांती, सद्भावना या वैश्विक तत्वांचा प्रचार

कोल्हापूर : येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश, जैन तत्वज्ञानाचा प्रचार, धर्म आणि अध्यात्मातून सामाजिक उन्नती, मठाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यीक चळवळीचे प्रणेते, उच्च विद्याविभूषित व डॉक्टरेटची पहिली पदवी मिळवलेले स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय ७८) यांचे गुरूवारी पहाटे महानिर्वाण झाले. त्यांच्या निधनानंतर जैन समाजाचे चैतन्य हरवल्याची भावना व्यक्त झाली. 

लहान वयातच शिक्षणाच्या ओढीने आपल्या गुरूंसोबत कोल्हापुरात आलेल्या डॉ. लक्ष्मीसेन स्वामीजींनी भगवान महावीरांच्या विचारांतून धर्म, मठ आणि अध्यात्माचा उपयोग शिक्षण आणि समाजाच्या उन्नतीसाठी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. गुरूवारी पहाटे तीन वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी दवाख्यान्यात नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज शुक्रवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता दक्षिण भारतातील १४ भट्टारक स्वामींच्या उपस्थितीत रायबाग (कर्नाटक) येथील लक्ष्मीसेन विद्यापीठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

    तमिळनाडूमधील गुडलूर गावी १९४२ साली जन्मलेल्या लक्ष्मीसेन स्वामीजीच्या  घरात धार्मिक वातावरण असल्याने अध्यात्माचे संस्कार बालपणापासूनच मनावर बिंबले. वयाच्या १२ व्या वर्षी शिक्षणाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले. येथे लक्ष्मीसेन स्वामीजींच्या सानिध्यात त्यांचे अध्ययन सुरू होते. दरम्यान महाराज आजारी पडल्यानंतर सर्वांनी त्यांना दीक्षा घेण्याबद्दल विनंती केली. आणि त्यांनी  वयाच्या २३ व्या वर्षी भट्टारक दीक्षा घेतली.  मात्र त्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. हिंदीमध्ये प्रवीण, संस्कृतमध्ये काव्यतीर्थ, अर्धमागधीमध्ये एम.ए. झाल्यानंतर वयाच्या ७५ व्या वर्षी सन २०१५ मध्ये शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी पूर्ण केली.  मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, संस्कृत, प्राकृत, अर्धमागधी, इंग्रजी अशा १२ भाषा त्यांना अवगत होत्या. 

पंचकल्याणक, मौजीबंधन, मंदिर जीर्णोद्धार, प्रायश्चित्त संस्कार, प्रवचन, मठाच्या परिसरात ४१ फूट उंचीचे मानस्तंभ, ज्वालामालिनी मंदिराची निर्मिती अशा धार्मिक कार्याबरोबरच अहिंसा, व्यसनमुक्ती आणि सुसंस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले आहे. श्री लक्ष्मीसेन विद्यापीठ शिक्षा संस्थेच्यावतीने कोल्हापूरसह रायबाग व बेळगावमध्ये शाळा, हायस्कूल चालवली जातात.

श्री लक्ष्मीसेन दिगंबर जैन ग्रंथमाला प्रकाशन संस्थेच्यावतीने आजवर ७५ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले आहे. ज्यात महास्वामीजींनी लिहिलेल्या १२ ग्रंथांचा समावेश आहे. रत्नत्रय मासिक प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र व कर्नाटकात सन १९८४ ते २०१४ या कालावधीत २१ जैन साहित्य संमेलने घेण्यात आली. कर्नाटकात आजवर पाच अधिवेशन झाली. या अधिवेशनांमुळे व प्रकाशनांमुळे जैन साहित्यिकांना व्यासपीठ मिळाले आहे. त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते शिवाय मठामध्ये श्री आदिनाथ ग्रंथालय चालविले जाते. 

Web Title:  Nirvana of Laxmisena Mahaswamy of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.