नीता अंबानी शिर्डीला आल्या; अन् मुंबई इंडियन्स जिंकेपर्यंत मंदिरात थांबल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 11:41 AM2019-04-19T11:41:13+5:302019-04-19T11:46:20+5:30

दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर काल, गुरूवारी रात्री मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपीटलमध्ये आयपीएल सामना सुरू होत असतानाच निता अंबानी यांनी शिर्डीत येऊन टीमच्या यशासाठी साईबाबांना साकडे घातले होते.

Nita Ambani visits Shirdi; And till the Mumbai Indians win, they stopped in the temple | नीता अंबानी शिर्डीला आल्या; अन् मुंबई इंडियन्स जिंकेपर्यंत मंदिरात थांबल्या

नीता अंबानी शिर्डीला आल्या; अन् मुंबई इंडियन्स जिंकेपर्यंत मंदिरात थांबल्या

शिर्डी : दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर काल, गुरूवारी रात्री मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपीटलमध्ये आयपीएल सामना सुरू होत असतानाच निता अंबानी यांनी शिर्डीत येऊन टीमच्या यशासाठी साईबाबांना साकडे घातले होते. त्यांनी मुंबई इंडीयन्सचा कलर असलेली निळ्या रंगाची शॉल साईसमाधीवर चढवली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात केली. यानंतर त्या पुन्हा आज सकाळी दर्शनाला येत पती मुकेश अंबानींसाठीही प्रार्थना केली. 

दर्शनानंतर निता अंबानी यांचा संस्थानच्या वतीने रविंद्र ठाकरे यांनी साईमूर्ती व शॉल देऊन सत्कार केला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर तसेच माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्या वतीने ठाकरे व घोरपडे यांनी अंबानी यांना शॉल प्रसाद रूपाने भेट दिली. योगायोगाने ही शॉलही निळ्याच रंगाची होती व रूबल अग्रवाल यांनी रामनवमीला साईसमाधीवर चढवली होती. 

 मुलगा अनंतचा काल, गुरूवारी तर पती मुकेश यांचा आज, शुक्रवारी वाढदिवस असल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले. मुकेश यांच्यासाठी त्यांनी दर्शनानंतर समाधी मंदीरालगत असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदीरात जावुन हनुमान चालीसाचे पठण केले. रात्रीच्या शेजारतीलाही त्यांनी हजेरी लावली. त्या दिल्लीतील सामन्यावर लक्ष ठेवुन होत्या. आरतीनंतर सामन्याचे पारडे बदलले, त्यामुळे त्या रात्री उशीरापर्यत मंदीर परिसरात थांबून राहिल्या. मुंबई इंडियन्सने सामना जिंकल्याचे कळल्यावर पुन्हा बाबांचे बाहेरून दर्शन घेवुनच त्या मंदीर परिसराच्या बाहेर पडल्या.


निता अंबानी यांचे काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिर्डी हेलीपॅडवर आगमन झाले. नेमकी त्याच वेळी आरती सुरू झाली. त्यामुळे त्यांनी हेलीपॅडवर गाडीतच थांबून घेतले व मोबाईलवर सार्इंची समाधी मंदीरात होणारी आरती ऑनलाईन पाहिली. यानंतर त्यांनी तिकडे दिल्लीत मॅच सुरू होत असतांना बरोबर आठ वाजता समाधी मंदीरात येवुन टीमच्या यशासाठी बाबांना साकडे घातले.
 

Web Title: Nita Ambani visits Shirdi; And till the Mumbai Indians win, they stopped in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.