साडे तीन फुट उंचीच्या नितेशच्या ध्येयाची उंची अफाट
By admin | Published: September 2, 2016 10:31 PM2016-09-02T22:31:47+5:302016-09-02T22:31:47+5:30
धडधाकट युवकाप्रमाणे शिक्षणाच्या माध्यमातुन जिवनात यशस्वी होण्यासाठी साडेतीन फुट उंचीच्या नितेश खरात या युवकाची ध्येयाची उंची मात्र अफाट आहे
Next
>- नाना हिवराळे / ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 2 - निसर्गाने अपंगत्व दिल्याने शरिराची उंची कमी आहे. तरी खचुन न जाता इतर धडधाकट युवकाप्रमाणे शिक्षणाच्या माध्यमातुन जिवनात यशस्वी होण्यासाठी साडेतीन फुट उंचीच्या नितेश खरात या युवकाची ध्येयाची उंची मात्र अफाट आहे. स्पर्धा परिक्षामधुन मी अधिकारी होणार या ध्येयाने नितेशची वाटचाल सुरु आहे.
खामगाव तालुक्यातील घारोड येथील नितेश वंसता खरात (वय २२) या युवकाला जन्मताच अपंगत्व येवून त्याची उंची सद्या इतर मुलापेक्षा खुपच कमी म्हणजे केवळ साडेतीन फुट आहे. घरी केवळ दोन एकर कोरडवाहू शेती आहे. आई वडील शेतात राबुन संसाराचा गाडा ओढीत आहे.
कोरडवाहू शेती असल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी दुसºयांची मोल मजुरी करतात. नितेश मोठा मुलगा असुन त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. शिक्षणातुन ध्येय गाठावे या विचाराने प्रेरीत होवून नितेशने महाविद्यालयीन शिक्षण खामगाव पुर्ण केले. वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणीत नितेशने पदवी मिळवली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे खुप कठीन झाले आहे. हालाखीच्या परिस्थीतीत नितेशने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यामुळे नोकरी साठी सद्या लागणारे गले लठ्ठ डोनेशन पुढचे शिक्षण घेवूनही भरता येणार नाही याची जाणीव ठेवून नितेशने स्पर्धा परिक्षेचा मार्ग धरला आहे.स्पर्धा परिक्षेची मनापासुन तयारी नितेश करत असुन मी अधिकारी होणारंच हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तो धडपडत आहे.
शाळा शिकत असतांना अनेक वेळा आपली उंची इतरापेक्षा खुपच कमीआहे म्हणून विद्यार्थी चिडवतात. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन जिवनातील ध्येय साध्य करण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु आहे
- नितेश खरात
स्पर्धा परिक्षेसाठी मिळतोय आधार
खामगाव शहरात स्पर्धा क्लासेस करतांना त्याची जिद्द व चिकाटी पाहून त्याला क्लासेस कडून फि माफ करण्यात आली हे विषेश तर खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु असलेल्या शेतकºयांच्या पाल्यासाठी मनोबल अभ्यासिकेत नितेशला मोफत स्पर्धा परिक्षेची पुस्तके वाचावयास मिळत आहेत.