शिवभोजन थाळीला नितेश राणे देणार टक्कर; विनामुल्य 'कमळ' थाळीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:37 PM2020-04-14T12:37:14+5:302020-04-14T13:20:45+5:30
कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही गेल्याच आठवड्यात जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये शिवभोजन थाळी सुरु केली होती.
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर गरिबांना कमी दरात जेवण देण्यासाठी सरकारकडून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. आता याला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आमदार पूत्र नितेश राणे टक्कर देणार आहेत. नितेश राणे यांनी कमळ थाळीची घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी असाच शिववडा पावला टक्कर देण्यासाठी ९ वर्षांपूर्वी छत्रपती वडा पाव सुरु केला होता.
कणकवली शहरामध्ये नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्या बुधवारपासून दररोज १५० लोकांसाठी 'कमळ' थाळी देण्यात येणार असल्याची घोषणा नितेश राणे यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे या थाळीसाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही. ही थाली विनामुल्य असणार आहे. कोरोना संकटाच्या काळात गरिबांना ''कमळ" थाळीमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
कणकवली शहरात आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्या पासून रोज १५० लोकांसाठी "कमळ" थाळी सुरु करीत आहोत.
— nitesh rane (@NiteshNRane) April 14, 2020
ही थाळी विनामुल्य असणार.
मला विश्वास आहे या संकटाच्या काळात गरिबांना "कमळ" थाळीमुळे नक्कीच मदत होईल!
याबाबतचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या थाळीमध्ये २ मूद भात, २ चपाती, १ वरण / डाळ ( आमटी ), १ भाजी या पदार्थांचा समावेश असणार आहे. हे केंद्र लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर ( संजीवन हॉस्पिटलजवळ) येथे सुरु करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत याठिकाणी १५० थाळी देण्यात येणार आहेत.
कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही गेल्याच आठवड्यात जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये शिवभोजन थाळी सुरु केली होती.
या थाळीत खालील पदार्थांचा समावेश असेल.
— nitesh rane (@NiteshNRane) April 14, 2020
२ मूद भात
२ चपाती
१ वरण / डाळ ( आमटी )
१ भाजी
स्थळ :- लक्ष्मी विष्णू हॉल
विद्यानगर ( संजीवन हॉस्पिटलजवळ)
कणकवली
वेळ : - दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत
धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश
धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप