Nitesh Rane: "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:26 AM2022-05-04T11:26:51+5:302022-05-04T12:06:50+5:30

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटमधून राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे.

Nitesh Rane: "Loudspeakers are not the real problem, a true Muslim never…", Nitesh Rane's tweet | Nitesh Rane: "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

Nitesh Rane: "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

Next

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पाठोपाठ झालेल्या ठाणे आणि औरंगाबाद सभेतही राज ठाकरे यांनी हाच मुद्दा लावून धरत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले असताना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या वादात उडी घेतली आहे. राणेंनी केलेल्या ट्विटची सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतची मुदत दिली होती. यानंतरही कारवाई झाली नाही, तर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, आज राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये भोंग्याशिवाय अजान देण्यात आली. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी तीन ट्वीट केले असून त्यामधून भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर देखील निशाणा साधताना रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
आपल्या ट्विटमध्ये नितेश राणेंनी रझा अकादमी आणि पीएफआयला लक्ष्य केलं आहे. "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही. खरी समस्या समाजात विष कालवणाऱ्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याविरोधात एकत्रपणे लढा देणे हीच काळाची गरज आहे. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे. तेव्हाच शांतता प्रस्थापित होईल", असं ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

राज्य सरकारवर निशाणा
ते पुढे म्हणतात, "रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून तिची कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेली नाही. अर्थात त्यांच्याकडे कोणताही नोंदणी क्रमांक नाही. तरीदेखील राज्य सरकार त्यांना आंदोलन करण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. त्यांना कुठून निधी मिळतो हे आपल्याला कसं कळणार? त्यांचे सर्व कामकाज ताबडतोब बंद व्हायला हवं." 

ते पुढे म्हणतात, "एक सच्चा मुसलमान कधीही त्याच्या देशाविरुद्ध किंवा राज्याविरुद्ध जाणार नाही. मुस्लीम समाज हिंदू किंवा इतर कोणत्याही समाजासारखंच आपल्या मायभूमीवर प्रेम करतात. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनाच द्वेष आणि भेदभाव पसरवततात. अमरावती, नांदेडमधील दंगली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आली आहे", असंही नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Nitesh Rane: "Loudspeakers are not the real problem, a true Muslim never…", Nitesh Rane's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.