संघ, भाजपाकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : नितेश राणे

By Admin | Published: October 25, 2016 08:46 PM2016-10-25T20:46:11+5:302016-10-25T20:46:11+5:30

तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणास जातीय रंग देण्याचे काम सरकारमधील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी

Nitesh Rane: Nitesh Rane | संघ, भाजपाकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : नितेश राणे

संघ, भाजपाकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : नितेश राणे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. 25 - तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणास जातीय रंग देण्याचे काम सरकारमधील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी दलित - मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी केला.
नाशिकमध्ये तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आलेल्या राणे यांनी जिल्हा रूग्णालयात पीडीत बालिकेची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, तळेगाव प्रकरणानंतर पोलिसांनी तणावाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली़ मात्र, त्यानंतर पोलिसांनी संबंध नसलेल्या लोकांची सुरू केलेली धरपकड ही सरकारमधील मंत्री, स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे आहे, असा आरोप त्यांनी केला नाशिक धुमसत असता पालकमंत्री शांतता प्रस्थापित करण्याऐवजी मुंबईला निघून अशी टीका करून त्यांनी पालकमंत्र्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची पालकत्व बदलण्याची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तळेगाव प्रकरणात पंधरा दिवसात दोषारोपत्र दाखल करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले मात्र पंधरा दिवस उलटूनही अद्याप न्यायालयात ते दाखल करण्यात आलेले नाही़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजपा सरकार बहुजनद्वेषी असलेले हे सरकारला मराठा समाजाला आरक्षण वा न्याय देऊ शकत नाही मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत शांततेत निघणाऱ्या या मोर्चाची भाषा जर सरकारला समजत नसेल तर यापुढे भाषा बदलावी लागेल व तो उद्रेग हा महाभयंकर असेल़, असेही आमदार नीतेश राणे म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: Nitesh Rane: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.