Nitesh Rane : नुपूर शर्मा यांच्या निमित्ताने हिंदूंवर वारंवार हल्ले होत असतील तर...; नितेश राणेंचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 02:24 PM2022-08-06T14:24:52+5:302022-08-06T14:25:14+5:30

नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने, अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Nitesh Rane warns, If Hindus are repeatedly attacked on the issue of Nupur Sharma, then our hands are not tied either | Nitesh Rane : नुपूर शर्मा यांच्या निमित्ताने हिंदूंवर वारंवार हल्ले होत असतील तर...; नितेश राणेंचा थेट इशारा

Nitesh Rane : नुपूर शर्मा यांच्या निमित्ताने हिंदूंवर वारंवार हल्ले होत असतील तर...; नितेश राणेंचा थेट इशारा

Next

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे पहिली घटना उदयपूरमध्ये घडली. नंतर अमरावतीत घडली. आज आमरावतीचा कोल्हेंचा तपास एनआयए करत आहे. जेव्हा नुपूर शर्मा यांची घटना घडली, तेव्हापासून भाजप म्हणून, आम्ही या कुठल्याही विषयाचे समर्थन करत नाही, हे सांगून हा विषय संपवला. पण त्यानंतर, अमरावतीत ज्यापद्धतीने कोल्हेंची हत्या करण्यात आली आणि नंतर 4 ऑगस्टला असाच प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडला. येथे प्रतीक पवार नावाच्या एका युवकावर १० ते १५ मुस्लीम युवकांनी हल्ला केला. आज तो मृत्यूशी झुंज देत आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने, अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील  कर्जत तालुक्यात प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला तो अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीकडे जात असताना, १० ते १५ मुस्लीम युवकांनी त्याला थांबवले आणि तू नुपूर शर्माचा डीपी ठेवतोय, गावाच्या इतर लोकांनाही ठेवायला सांगतोय. हिंदू-हिंदू म्हणू फार आवाज करतोय. असे म्हणत, या १०-१५ लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात हत्यारं होती, कोयते होते. त्या एका युवकाला हल्ला करून त्यांनी खाली पाडले. तो युवक बेशुद्ध पडला. त्यांना वाटले तो युवक मेलाय आणि मग ते लोक तेथून निघून गेले. 

यानंतर, त्याच्या आजू-बाजूचा मित्रपरिवार तेथे आला आणि त्यांनी प्रतीकला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तेथे योग्य उपचार होऊ शकला नाही, म्हणून त्याला आज पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला ३५ टाके पडले आहेत. त्याच्या बरगड्यांमध्ये प्रचंड मार लागला आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले. 

तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही -
याच वेळी, माझा मुद्दा एवढाच आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा हा देश आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही. हा संदेश आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला आहे, असेही राणे यांनी सांगितले. 

संबंधित पोलीस अधिकारी हिंदूंच्याच घरी जाऊन केस दाबण्याचा प्रयत्न करत होते - 
यावेळी, तेथील संबंधित पोलीस अधिकारी (पीआय) या हिंदूंच्याच घरी जाऊन केस दाबण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर, सर्व हिंदू संघटना एकत्र आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांसोबत बोलल्या आणि नंतर संबंधितांविरोधात कडक पद्धतीने एफआयआर नोंदवण्यात आला, असेही  राणे यांनी म्हणटे आहे. एवढेच नाही, तर आजही काही मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करत, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष आहे. ते आयजीसोबत बोलले आहेत. एसपीही संपर्कात आहेत. त्यामुळे संबंधितांना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

हे काही महाविकास आघाडीचे सरकार नाही -
आता हे काही महाविकास आघाडीचे सरकार नाही. आता नवाब मलिक अल्पसंख्याकमंत्री नाही. आता तुम्ही कुठल्याही हिंदूंना टार्गेट केलं तर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते, असा स्पष्ट संदेश मी या पत्रकार परिषदेतून देत आहे. आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. आमच्या देशात शरिया कायदा लागू नाही. तुम्ही तुमच्या देवतांवर कुणी काही बोलल्यानंतर, विसरायला तयार नसाल तर, त्या बाजूने आमच्या हिंदू देवी देवतांची विटंबना होणारी प्रकरणे राज्यात घडतात. मग जर तुम्ही विसरायला तयार नसाल, तर आम्ही का गप्प बसायचं? आम्ही का विसरायचं? असे सवाल करत, आमच्या लोकांना मारण्यापर्यंत तुमची हिंमत जात असेल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल. त्यामुळे आमच्या लोकांना कुणीही हात लावायची हिंमत करू नये. असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला. तसेच, प्रतिक पवार नावाच्या युवकाबरोबर आम्ही  ताकदीने उभे आहोत, असेही ते म्हणाले.

माझे सहकारी आमदार गोपिचंदजी पडळकर लवकरच संबंधित कुटुंबाची भेट घेणार आहेत. मीही त्या कुटुंबाची भेट घेणार आहे. या पूर्ण घटनेची चौकश अमरावतीच्या घटनेप्रमाणेच एनआयएने करावी, अशी मागणीही आम्ही करणार आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Nitesh Rane warns, If Hindus are repeatedly attacked on the issue of Nupur Sharma, then our hands are not tied either

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.